ताज्या घडामोडीसामाजिक

सामाजिक प्रबोधनाचे औचित्य साधून थोर महा पुरुषांचे जयंती आणि स्मृतिदिन साजरा 


सामाजिक प्रबोधनाचे औचित्य साधून थोर महा पुरुषांचे जयंती आणि स्मृतिदिन साजरा 

सिन्नर तालुक्यातील धोंडबार येथील अनोखा उपक्रम

सिन्नर प्रतिनिधी

संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती व क्रांतीवीर खाज्या नाईक यांचा स्मृतिदिन या निमित्ताने धोंडबार येथे शि.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज , राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा, खाजा नाईक यांच्या प्रतिमांचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य श्री.तातू भाऊ जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे पोलीस पाटील श्री.चंद्रभान खेताडे यांनी केले. यानंतर

Advertisement

ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी खरा वारकरी संप्रदाय कसा होता क्रांतिकारक महापुरूषांचे विचार काय होते भारतीय संविधानाचे महत्व या विषयावर समाजाला प्रबोधन केले.ते म्हणाले की, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज या संतांनी उभी केलेली चळवळ ही कोणत्या जाती धर्मा विरोधात नव्हती तर ती समाजाचं शोषण करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, भेदभाव करणाऱ्या,देवाधर्माच्या नावाखाली समाजाला लुटणाऱ्या, कर्मकांड करणाऱ्या कर्मठांविरूध्द होती.संतांची शिकवण ही मानवतेची होती वारकरी संप्रदायात जाती, धर्म, पंथ, अंधश्रद्धा,भेदभाव, कर्मकांड याला थारा नव्हता.तर माणुसकी मानवता हाच खरा धर्म आहे सगळी माणसं एक समान आहेत.हे मानणारा खरा वारकरी संप्रदाय आहे.क्रांतीकारक महापुरूषांनी जनतेवर समाजावरील होणाऱ्या जुल्मी अन्याय अत्याचाराविरूध्द लढा दिला होता त्यांचाही कोणत्या जाती धर्माविरुद्ध नव्हता.त्यांचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे.भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयाला आपले हक्क अधिकार प्रदान करते.हजारो वर्षे शोषीत पिडीत जनतेला स्त्रियांना संविधानामुळे न्याय मिळाला आहे.संविधानामुळेच लोकशाही टिकून आहे.त्यामुळे संविधान टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.असे ते म्हणाले.वादक मारुती खेताडे, अमोल कूंदे, गायक रवी खेताडे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे आभार श्री.मोहन खेताडे यांनी मानले.

यावेळी शि.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ह भ प चिंतामन महाराज,महामित्र दत्ता वायचळे, हरिभाऊ तांबे, राजाराम खेताडे सर, दादा खेताडे, नाना खेताडे अशोक खेताडे, रामचंद्र म्हसू खेताडे, गेनू गोविंद खेताडे, यशवंत म्हसू खेताडे,राजाराम खेताडे सर,सुनील लहानु जगताप सुनील लहानु जगताप, देवराम कचरू जगताप, प्रकाश खंडू जगताप,आनंद नवाळे, नंदू नवाळे,राहुल साबळे,प्रवीण जगताप,समाधान उबाळे, अशोक शिवराम खेताडे, चंद्रभान दामू खेताडे,रमेश खेताडे, देवराम दादा खेताडे, सुनील जगताप समाधान खेताडे , देवचंद जाधव,पांडुरंग खेताडे, सागर भालेराव, रामु इदे ,विजय मुठे, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक अशोक विठ्ठल डावरे, तसेच सर्व भजनी मंडळ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *