सतीश नेहे यांना राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार जाहीर
- सतीश नेहे यांना राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार जाहीर
नाशिक :
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय आयकॉन पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात सिन्नर येथील सतीश विठोबा नेहे यांच्या सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना प्राईड ऑफ इंडिया नॅशनल आयकॉन अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.३० वा. रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ शालिमार जवळ नाशिक येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमख पाहुणे म्हणून झी २४ तास या राष्ट्रीय न्युज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार, मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री करिष्मा चव्हाण, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव अॅड. नितीन ठाकरे, धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सतीश नेहे यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिंनदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.