*व्ही एन नाईक नाईक महाविद्यालय सिन्नर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*व्ही एन नाईक नाईक महाविद्यालय सिन्नर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
सिन्नर: (प्रतिनिधी)
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव शिक्षण प्रसारक संस्थेचे टी. एस. दिघोळे कला, एन. एम. आव्हाड, वाणिज्य व एस. बी. सांगळे विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे *15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे* आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. स्वातंत्र्याचा *’अमृत महोत्सव’* साजरा करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमासाठी *संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मा.श्री हेमंत शेठ नाईक,संस्थेचे माजी विश्वस्त मा.श्री विनायक शेळके, सिन्नरचे उद्योजक मा.श्री छगन शेठ आहेर, तसेच मा. श्री. विलासराव करपे, मा. श्री बाजीराव दराडे, मा. श्री गणेशराव घुले, मा. श्री रामनाथ सांगळे, मा. श्री विष्णुपंत वाघ सामाजिक कार्यकर्ते, मा. श्री कराड सर, पतपेढी अधिकारी मा. सुशांत जाधव तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब चकोर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले* उपस्थित होते.या *कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे जेष्ठ माजी विश्वस्त मा. श्री विनायक शेळके यांनी भूषवले*
या कार्यक्रम प्रसंगी सकाळी ठीक 7.30 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणातून कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर *संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मा. हेमंत शेठ नाईक व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले* यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी देशाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर *महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा* व ग्रामीण रुग्णालय आयोजित ‘ *बेटी बचाव’ या स्पर्धेतील विजेत्यांचा* उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये महाविद्यालयाचे समन्वयक प्रा *. डॉ. बाळासाहेब चकोर* यांनी देशाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना यांनी आजच्या तरुण पिढीने राष्ट्राच्या संपत्तीचे संरक्षण करून देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच *संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मा श्री हेमंत शेठ नाईक* यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना देशासाठी बलिदान दिलेल्या नेत्यांच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे सांगितले. तसेच महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ. किशोर पखाले* यांनीही देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्ष भाषणांमधून *संस्थेचे माजी विश्वस्त मा. श्री विनायक शेळके* यांनीही देशाच्या सार्वभौमत्वाचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात *राष्ट्रीय सेवा योजना व श्री साईनाथ ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले* यावेळी अनेक विद्यार्थी स्वयंसेवक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले या कार्यक्रमाचा समारोप *राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘वृक्षारोपण’ करून करण्यात आला.* वृक्षारोपणासाठी सामाजिक कार्यकर्ते *मा. श्री रामनाथ सांगळे* यांनी महाविद्यालयास *50 विविध प्रकारची झाडे दिली.* *विद्यार्थ्यांच्या खाऊ वाटपासाठी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मा.श्री.जयंतराव आव्हाड साहेब यांनी मदत केली* .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चोथवे यांनी केले तर प्रा. शुभांगी बोडके यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.