*भिकुसा हायस्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
*भिकुसा हायस्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
सिन्नर प्रतिनिधी
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, भिकुसा हायस्कूल, सिन्नर येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोमनाथ जगदाळे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. नवनाथ जोंधळे, शालेय व्यवस्थापन संघ उपाध्यक्ष श्री. अमोल वारंगसे, माता-पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. तृषाली बोडके, तसेच मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आरोही दळवी, वीरेंद्र कासारे आणि अक्षदा खोकले या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीरांची महिमा सांगत देशभक्तीचा जागर केला. तसेच वैष्णवी मंडल या विद्यार्थिनीने देशभक्तीपर नृत्य सादर करत उपस्थितांचे मचे मन जिंकले.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोमनाथ जगदाळे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या गाथा संगत येणाऱ्या भविष्यात भारत देश हा जगाचा अधिराजा असेल आणि हा आधीराजा बनवण्यासाठी विद्यार्थीच हे देशाचे भविष्य असणार आहेत असे आवाहन विद्यार्थ्यांना करत देशभक्ती व देशप्रेम याविषयी माहिती दिली.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. रामनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने व संचालन आणि ध्वजास्व मान्यवरांस मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रभाकर बोडके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.