नाशिक जिल्हा बँकेच्या जमिन जप्तीच्या विरोधात आंदोलनाला यश मिळण्याचे संकेत;
नाशिक जिल्हा बँकेच्या जमिन जप्तीच्या विरोधात आंदोलनाला यश मिळण्याचे संकेत;
आंदोलनकर्त्यांचा दावा
नाशिक प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या सुलतानी धोरणाविरुद्द गेल्या सव्वा तीनशे दिवसापासून सुरु असलेले शेतकरी संघटना समन्वय समितीचे आंदोलन यशस्वी होत असल्याचा दावा या आंदोलनाचे प्रणेते भगवान बोराडे यांनी केला आहे. राज्य सरकारने राज्यातील 938 आदिवासी संस्थांच्या कर्जाच्या फायली मागवल्या असून थोड्याच दिवसात या कर्जमाफीचा विचार होण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.यावरून बोराडे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
नाशिक जिल्हा बँकेने 101 ची कारवाई, 107 ची कारवाई, 100 /85 र चे प्रमाणपत्र मिळवून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीर शेतकऱ्याचे नाव हटवून त्या जागी विविध कार्यकारी सोसायटीचे नाव लावण्याचे कारस्थान करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार सुरू केल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वतीने 1 जून 2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाला 323 दिवस उलटून गेले असून यानंतरही आंदोलन बेमुदत सुरूच राहणार असल्याचे बोराडे यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रकारचे आंदोलने करून झाल्यानंतर 1 जून 2023 रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले. शेतकरी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून सतत मंत्रालय मुंबई नागपूर दिल्ली येथे पाठपुरावा केल्यामुळे 938 आदिवासी संस्थांच्या कर्ज माफीचा मार्ग मोकळा झाल्याचा त्यांचा दावा आहे.
या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी व तसेच महाराष्ट्र राज्यातून अनेक शेतकरी संघटनेचे व इतरही पक्षांचे व सामाजिक सांप्रदायिक संघटनेचे नेते यांनी उपस्थिती लावली. या आंदोलनाला सुरुवातीपासून विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले या आंदोलनाला काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात विद्यमान आमदार हिरामण खोसकर प्रहार संघटनेचे
बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष दीपक पगार वाल्मीक सांगळे शेतकरी संघटनेचे वाशिम विभागाचे अध्यक्ष नारायण विभुते अमरावती येथील शेतकरी नेते वारकरी कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष धनंजय काकडे पाटील अकोला येथील सहकार चळवळीतील अनुभव असलेले संजय मालोकर राष्ट्रीय बहुजन पार्टीचे रमेश पवार 938आदिवासी विविध कार्यकारी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री कैलास बोरसे धनवान भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष केवल बब्बर महाराष्ट्र राज्याचे सचिव सुरेश परब बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र धावले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते समन्वय समिती सदस्य दिलीप पाटील शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार,जय बाबाजी भक्तपरिवार परमपूज्य रामानंद महाराज शेतकरी वारकरी आघाडीचे अध्यक्ष ह भ प अक्षय महाराज आहेर
समन्वय समिती सदस्य नाना बच्छाव
आदिवासी सेवक ह भ प धोंडीराम महाराज थैल
खेमराज कौर गणपत बाबा पाटील मांगू कापडणीस सुधाकर मोगल तुषार गांगुर्डे दत्ता गवळी सोमनाथ झाल्टे खंडेराव पाटील,ह भ प संपत महाराज धोंगडे संजय झाल्टे विलास बोरस्ते
मोहन गावंडे बाळासाहेब चौधरी भाऊसाहेब चव्हाण, रमेश बोरस्ते सुनील देवरे गिरीधर पवार मोहन बाबा बहिरम विश्राम कामाले पंडित बागुल
नंदू भाऊ देवरे मानू पाटील भाऊसाहेब पवार संतोष चव्हाण रमेश पाटील जयराम बळीराम कांतीलाल भोये दगाजी अहिरे यशवंत गावंडे बाळासाहेब बोरस्ते नामदेव बहिरम रमेश पाटील बोरस्ते अशोक देशमुख अशोक भंडारे बाळासाहेब भंडारे,मनोज वाघ अनंत पाटील सादडे देवा बापू वाघ
रामराव मोरे प्रभाकर थोरात आनंदा चौधरी चींधू पाटील हेमंत जाधव नवनाथ गावले पुंजा पाटील बाजीराव शिंदे खंडेराव नाना मोगरे गंगाधर नाना शिंदे जयराम मोरे नामदेव पवार सुनील पवार भगवंतराव भंडारे पुंडलिक सहाने उमाकांत शिंदे अशा अनेक कार्यकर्त्यांनी या कर्जमुक्ती आंदोलनाला बळ देऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
थकित कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे कर्जमुक्ती आंदोलन सुरूच राहील असेही बोराडे यांनी सांगितले.