ताज्या घडामोडीसामाजिक

तळेगाव(अं) येथे विद्यार्थ्यांचे रॅलीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन 


तळेगाव(अं) येथे विद्यार्थ्यांचे रॅलीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन 

नाशिक:प्रतिनिधी (बाळासाहेब सोनवणे)

तळेगाव अंजनेरी येथील पुणे विद्यार्थी गृह संचलित विद्या प्रशाला हायस्कूल व ज्युनियर कलिजमध्ये येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा,मतदान जनजागृती व्हावी याकरिता स्वीप अंतर्गत विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी मुख्याध्यापक शरद कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन केले.

Advertisement

यावेळी ज्युनियर कॉलेजच्या मुला-मुलींनी तळेगाव अंजनेरी ज्या गावातून मतदान जनजागृती रॅलीद्वारे ‘माझे मत माझा अधिकार, तुमचे मत आमचे भविष्य’ इ.घोषणा देत परिसर दणाणून टाकला.यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य,पोलीस पाटील, तसेच प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्व समजावून सांगत मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सुंदररित्या सादरीकरण करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. शाळेने राबवलेल्या या वेगळ्या उपक्रमाचे गावातील सर्व नागरिकांनी जिल्ह्यात स्वागत केले.

यावेळी मुख्याध्यापक शरद कोठावदे, पर्यवेक्षक संजय जोशी, सर्व शिक्षक-शिक्षेकत्तर, विद्यार्थी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोरे, सहसचिव शरद पगार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *