ताज्या घडामोडीसामाजिक

एक सफर… प्रतिक्रियेच्या गावात!!!


किरणकुमार चव्हाणांची बातमी सुंदर होती….. जसा माणूस तशीच बातमी

“कुमार” नावाच्या दोन संवेदनशील व्यक्तींचा एक हृदयस्पर्शी संवाद
(लेखक – कुमार कडलग | शुभेच्छा – किरणकुमार चव्हाण)

बातमी ही फक्त घटनेची नोंद नसते. ती मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेला एक स्पर्श असतो – आणि तो स्पर्श जेव्हा कुमार कडलग यांच्या लेखणीतून येतो, तेव्हा तो एका व्यक्तीच्या अस्तित्वाला शब्दांनी अमर करतो.

अलीकडेच पोलिस उपआयुक्त (गुन्हे), नाशिक – किरणकुमार चव्हाण यांच्यावर त्यांनी लिहिलेली बातमी वाचली. ती बातमी नव्हती, ती एक आठवण होती, एक अनुभव होता, एक व्यक्तिमत्वाचं शब्दचित्र होतं. लेख वाचताना असं वाटतं की ‘कुमार’ नावाच्या दोन व्यक्तींचा हा एका क्षणासाठी झालेला संवाद आहे — एकाने आयुष्यभर कर्माने माणूस जपला, तर दुसऱ्याने त्या माणसाच्या आठवणी शब्दांमधून.

हे एक विलक्षण योगायोग होतं – किरणकुमार यांचं कर्तृत्व जितकं मोठं, तितकंच कुमार कडलग यांचं त्यांना दिलेलं शब्दस्मारक प्रभावी. कुठेही अति भावनांची गळमिळ नाही, पण तरीही मन हळवं होतं. ती “बातमी” नसून “बोधकथा” वाटावी, अशी साद.

कुमार कडलग सरांचं हेच वैशिष्ट्य – ते माणसाच्या हयातीतले संदर्भ आणि स्मृती यांचं असं काही विणतात की वाचक त्या व्यक्तीच्या सहवासात थोडा वेळ का होईना, जगून येतो. आणि त्या व्यक्तीचं अस्तित्व क्षणभर अजर होतं.

Advertisement

आजही, बातम्यांची दुनिया वेगात धावत असताना, अशा संवेदनशील लेखणीने लिहिलेलं एक लेखन मनात खोलवर घर करतं. ‘कुमार’ कडून ‘किरणकुमार’ला दिलेली ही शब्दांमधली सलामी – हीच खरी माणुसकीची पत्रकारिता

संदिप बबनराव धात्रक नासिक – एक शुभचिंतक

 

पण सर,आपण म्हणतो सत्य परेशान हो सकता हे लेकिन पराजित नही, पण हे सत्यचं त्याच्या पराभवाला कारणीभूत असते. सत्याच्या मार्गाने जाणाऱ्याला वाटते आता आपणच जिंकणार आहोत पण ऐन वेळेस सत्याला एकटे पाडले किंव्हा त्याला तरी आडवे पाडले जाते, किंव्हा त्याचा होणारा विजय कुणाला तरी विकला जातो, आणि सत्य हरते.त्याला आडवे पाडणारे त्याच्या जवळचे, त्याला चांगले ओळखणारे, तो सर्वात जास्त भरवसा ज्यांच्यावर ठेवतो त्यांच्या पैकीच कुणीतरी फितूर होतात. ज्या वेळेस त्याला खरंच कुणाच्या तरी आधाराची गरज भासते त्यावेळेस त्याच्या मागे कुणीच नसते. सत्याच्या मार्गांवर तो एकटाच चालतो, त्याच्या अश्या वेळी त्याच्या पाठीशी कुणीही नाही उभे राहात, यामुळे तो अश्या गोष्टींना अर्ध्यावरती तरी सोडतो नाहीतर स्वतःला तरी संपवतो. सर्वच जण तुमच्या या नायका प्रमाणे नाही जगत.

भगवान पवार सटाणा – एक शुभचिंतक

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *