व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र संमेलनास अशोक वानखेडेंची उपस्थिती लाभणार
.व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र संमेलनास अशोक वानखेडेंची उपस्थिती लाभणार
नाशिक प्रतिनिधी
तब्बल ४१ देशांत पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करून पत्रकारितेसह बातमीदारांची जीवन शैली उंचावण्यासाठी धडपड करणारी तसेच देशांत आणि राज्यात सर्वाधिक सदस्य असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र पत्रकार संमेलनाचे येत्या २५ मे रोजी आयोजन करण्यात आले असून या संमेलनास देश पातळीवरील विविध माध्यम समूहाच्या संपादकांसह प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार अशोकभाऊ वानखेडे उपस्थित राहणार आहेत. नाशिक मध्ये एका व्याख्यानासाठी अशोक भाऊ वानखेडे आले असता व्हॉइस ऑफ मीडियाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. तत्पूर्वी
नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर व्हाईस ऑफ मीडियाच्या विविध समित्यांच्या प्रमुखांची बैठक प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत 25 मे 2024 रोजी होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनाच्या संदर्भात विविध विषयांवर व विविध समित्यांच्या कामाबद्दलचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रा. श्रीकांत सोनवणे, जिल्हाध्यक्ष कुमार कडलग महानगर अध्यक्ष इमरान शेख , जिल्हा सरचिटणीस देवानंद बैरागी,सुधीर उमराळकर, विठ्ठल भाडमुखे, नरेंद्र जोशी, संदीप धात्रक,मायकल खरात,नरेंद्र पाटील,वकार खान, करण बावरी,रश्मी मारवाडी, महिला जिल्हा समन्वयक अश्विनी पुरी, संजय परदेशी,भगवान पगारे,ज्ञानेश्वर तुपसुंदर, योगेश रोकडे आदीनी उपस्थिती नोंदवून संमेलनसंदर्भात विचार मंथन केले. विविध समित्यांच्या सदस्यांवर जबाबदारी सोपविण्यात आल्या.सर्व समितीच्या सदस्यांनी तात्काळ कामाला सुरुवात करून पत्रकारांचा हा कुंभ मेळा यशस्वी करण्याचा निर्धार केला.