ताज्या घडामोडीराजकीय

संगमनेर युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी डॉ. जयश्री थोरात यांची निवड


संगमनेर युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी डॉ. जयश्री थोरात यांची निवड

संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. जयश्री थोरात यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, युकाँ प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार व सहप्रभारी एहसान खान व युकाँ जिल्हाध्यक्षा स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्या निवडीची घोषणा केली.अभ्यासू व सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच डॉ. जयश्री थोरात यांनी कॅन्सर उपचार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. कॅन्सर रुग्णांना त्या टाटा व एसएमबीटी हॉस्पिटल येथे योग्य उपचारांबाबत मार्गदर्शन करतात. आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली.

 

 

Advertisement

महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना मार्गदर्शन, सायकल व शालेय साहित्य वितरण, क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रमातून त्यांनी युवकांमध्ये जन जागृती केली. दरम्यान, मावळते अध्यक्ष नीलेश थोरात यांची नगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. ‘काँग्रेसचा विचार माझ्या कुटुंबात गेल्या शंभर वर्षांपासून रुजला आहे. राजकारणात सत्ता आल्या, गेल्या मात्र वडील आ. बाळासाहेब थोरात कायम काँग्रेसच्या विचारांशी बांधील राहिले. काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे. तालुक्यात प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर भर राहील.

कोट

‘काँग्रेसचा विचार माझ्या कुटुंबात गेल्या शंभर वर्षांपासून रुजला आहे. राजकारणात सत्ता आल्या, गेल्या मात्र वडील आ. बाळासाहेब थोरात कायम काँग्रेसच्या विचारांशी बांधील राहिले. काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे. तालुक्यात प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर भर राहील.

        …. जयश्रीताई थोरात….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *