महाराष्ट्रसामाजिक

शांतवृत्ती, कर्तव्यभावना व चांगुलपणावरील श्रद्धेने जीवन यशस्वी करणाऱ्या इंजि. सौ. मिरा सानप


शांतवृत्ती, कर्तव्यभावना व चांगुलपणावरील श्रद्धेने जीवन यशस्वी करणाऱ्या
इंजि. सौ. मिरा सानप

क तृ त्व शक्ती, जिद्द, चिकाटी आणि समाज कार्यात कोणत्या मुद्द्यावर आणि हुद्द्यावर कशा प्रकारे काम करावे याचे नियोजन बध्द समीकरण म्हणजे नशिक जिल्हा भाजपा सरचिटणीस इंजिनियर सौ. मीराताई सानप.. गेल्या वर्षीच्या भेटीत त्यांच्या ठायी असणारी महत्वाकांक्षा ऐकून थोडे कौतुकच वाटले होते, की राजकारणात नवख्या असूनही मोठी झेप घेण्याची तयारी आणि गुरू माऊली वरील असणार त्यांचा विश्वास आज सार्थकी होताना दिसतना आनंद होत आहे. २०१५ साली वास्तूशास्त्रानुसार वास्तूंचे प्लॅन काढण्यास सुरुवात केली. २ वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या उद्योगी स्वभावाने आणि त्यांच्या ठायी असलेल्या कार्यशैलीतून लवकरच त्या राजकारणात प्रभावी बनल्या. कोणत्यही वयोगटातील महिलांना मार्गदर्शक बनवेल अशी ही कहानी म्हणायला हरकत नाही. मिरा सानप यांचा जन्म ०६/०२/७९ रोजी त्याच्या मामाच्या गावी संगमनेर तालुक्यातील पिंपळे या गावी झाला. त्याच्या आईचे नाव द्रोपदाबाई आणि वडिलांचे नाव लक्ष्मण भाबड रा. चास ता. सिन्नर येथील एक शेतकरी कुटुंब होते. मिरा ३ रीला असतांना त्याच्या वडिलांच्या मृत्युनंतर आईनी कष्ट करून त्याना व त्याच्या दोन्ही भावांना लहानाचे मोठे केले. संयुक्त कुटुंब पध्दती असल्यामुळे अगदी वयाच्या १७ व्या वर्षी चास येथील एका मोठ्या शेतकरी संयुक्त कुटुंबात सुदाम सानप यांच्यासोबत विवाह झाला. पण म्हणतात ना नशिब आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. कामानिमित्त सुदाम सानप सिन्नरला आल्यानंतर त्यांनी आयटीआयला अॅडमिशन घेवून सिविल ड्राफ्ट्समनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एक गृहीणी म्हणून १४ वर्ष त्यानी घर अधिक मुले सांभाळली.

Advertisement

नंतर स्वतःच्या वास्तू विशारद या कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. या सगळ्या कामात व प्रत्येक निर्णयात त्यांचे पती त्यांना सर्वोतपरीने मदत करत होते. मग तर काय ठरले.
आधीपासून दत्तसेवेमध्ये असल्याने अध्यात्मिक गुरु अण्णसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ मध्ये सिन्नर तालुक्यासाठी त्यांनी वास्तु विशारद म्हणून मानद मिळाली. खऱ्या अर्थाने मिराताईच्या कामाची सुरुवात झाली. संपूर्ण वास्तूचा आय, व्यय, घराचे नक्षत्र, घराचे आयुष्य या सगळ्या बाबींचा अभ्यास करून संपुर्ण वास्तू उभी करण्याचे काम त्या कसोशीने करतात. यासोबतच त्या काळाच्या सोबत ज्ञानसंपादन करण्यासाठी सिविल इंजिनियरचा डिप्लोमा पुर्ण केला. आज त्या सिन्नर परिसरात वास्तूशास्त्रानूसार साइटचे काम करत असतांना ऑनलाइन वास्तूटिप्स देवून कन्सल्टींग ही करतात. खेळ व कवितेची आवड असलेल्या मिराताईसारख्या महिला घरच्या परिस्थिीतीमुळे अपल्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी स्वतःच स्वतःच्या पंखात बळ भरतात. त्यासाठी पाहिजे फक्त इच्छाशक्ती आणि आत्म विश्वास. आज मिराताई एक वास्तू विशारद असून भारतीय जनतापार्टी सरचिटणीस सिन्नर येथून राजकारणात सक्रीय राहून भाजपा श्रेष्ठीचे त्यांचे कार्य डोळ्यात भरल्याशिवाय राहिले नाही. याचीच परिणती म्हणून त्यांना जिल्हा भाजपा सरचिटणीस पद मिळाले. शेतकऱ्यांच्या समस्या, शेती मालाला मिळणारा हमीभाव , जन सामान्यांच्या समस्या, मोदी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना गोर गरिबांपर्यंत त्या कसोशीने पोहचवत आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्त्या महिला आघाडीवर अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. राष्ट्रीय पातळीवर भगवान बाबा गड वंजारी समाज उत्सव समितीवर त्यांची नुकतीच वर्णी लागली आहे.
एक महिला तिच्या केवळ इच्छा शक्तीवर उत्तुंग भरारी घेवून प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मीराताई सानप भाबड यांचे नाव महिला दिंन म्हणून घ्यायला हरकत नाही.
शब्दांकन – रश्मी मारवाडी
संगमनेर, जि. अ.नगर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *