*कोणतेही कार्य समर्पण भावनेने केले पाहिजे ; संदीप काळे*
*कोणतेही कार्य समर्पण भावनेने केले पाहिजे ; संदीप काळे*
शिर्डी प्रतिनिधी
पत्रकारांवरील अपेक्षाचे ओझं वाढत चालले आहे. गेली अनेक दशके पत्रकारांच्या समस्या काही केल्या सुटल्या नाहीत. व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून एकसंध विचार आणि चांगल्या विचार सरणीची मोट बांधणी करण्याचे काम सुरू आहे. माणसाला डेडीकेट होता आले पाहिजे. संघटनेत नवनिर्माण करण्याची ऊर्जा असते. विखुरलेल्या पत्रकारांना एकत्र करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून कोणतेही कार्य माणसाने समर्पण भावनेने केले पाहिजे असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. शिर्डी येथे संघटनेच्या वतीने 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे बोलत होते. ते म्हणाले की, बातम्यांचा वेध घेता घेता आपणास वर्तमान आणि भविष्याचाही वेध घेता आला पाहिजे. कुटुंब आणि आरोग्याला प्राधान्य देत आपण पत्रकारिता केली पाहिजे. खरतर पत्रकारांच्या समस्या ह्या नजरेसमोर आल्यानेच आपण त्या नजरेआड होऊ देणार नाही. पत्रकारांना न्याय देण्यासाठी संघटनेची मजबूत बांधणी होत आहे त्यास महाराष्ट्र इतर राज्यासह देश विदेशातून पत्रकार बांधवांचे सहकार्य मिळत आहे
या संघटनेच्या माध्यमातून पंचसूत्रीवर पत्रकारांच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय देणार आहोत. पत्रकारांना शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे संदीप काळे यांनी सांगितले.