महाराष्ट्र

वेध लोकशाहीच्या वारसांचा:८२ टक्के निरक्षर मतदारांनी निवडली पाहिली लोकसभा 


वेध लोकशाहीच्या वारसांचा:८२ टक्के निरक्षर मतदारांनी निवडली पाहिली लोकसभा 

सिन्नर

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर अवघ्या चार वर्षात जगाच्या पाठीवरील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आगळा वेगळा प्रयोग भारतात राबवला गेला. पहिल्या वहिल्या लोकसभा निवडणुकीचा पहिला प्रयोग पहिले निवडणूक अधिकारी सुकुमार सेन यांनी १९५२ साली राबवला.स्वातंत्र मिळाल्यानंतर आपले सरकार आपण निवडून दिलेल्या माणसांकडून चालवू शकतो हेच मुळी जवळपास ८२% निरक्षर असलेल्या भारतासाठी उत्सुकतेसोबतच मोठा कुतूहलाचा विषय होता.त्यानंतर गेल्या शहात्तर वर्षात आज आपण सगळे १८ व्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत.

याच प्रक्रियेत नाशिक लोकसभा मतदार संघ देखील हिरीरीने, कौतुकाने आणि तितक्याच उत्सुकतेने सहभागी झाला असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत येत असताना आता कुठे खरा रंग चढू लागला आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघांचा विचार करता पहिली लोकसभा नासिक मध्ये १९५२ साली घेण्यात आली.

देशभरातील एकूण ४८९ मतदार संघासाठी साधारण १७ कोटी मतदार २१ वर्षे पूर्ण झालेले आपला मतदानाचा हक्क बजावणार होते. काळ गंभीर होता. ,अशा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा ना सरकारला, ना निवडणूक आयोगाला , ना मतदारांना अनुभव… राहिले सहीले ते भारतात असलेली केवळ १८% साक्षरता.. प्रचार साधन फक्त बैलगाडी, घोडागाडी, पोस्टर, पत्रके आणि लाऊड स्पीकर… गल्लोगल्ली घराघरात जावून उमेदवार तळागाळातील मतदारांना जाहीर सभा घेऊन मतदानाचे आवाहन करत होता. त्या रंगलेल्या भिंतीवरील निवडणूक चिन्हाचा ठसा मतदारांवर उमटत असे. त्यातही ४५% महिला होत्या. एकूण २६ राज्यात १८७४ उमेदवार रिंगणात आणि त्यांच्या सोबतीला ३९७ वृत्तपत्रे जोमात आपले काम करत होती. एकूण निवडणुकीचा खर्च बघितला तर ते लगभग १४ कोटी… अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा बोलबाला.. ७५% जागा जिंकून बहुमतात आलेला..

आपल्या तत्कालीन निवडणूक अधिकारी सेन यांनी त्यावेळी सर्व पक्षीय नेत्यांच्या सगळ्या शंकाचे निरसन करून सर्व अडचणीतून मार्ग मोकळा करत चार महिन्यात सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडली आणि भारतात पिढीजात लोकशाही प्रत्येक भारतीयांच्या रक्तात भिनली..

Advertisement

त्याविषयी सेन यांचे आभार मानावे तेवढे थोडेच …

बॉक्स :-

नाशिकचे पहिले खासदार गो. ह. देशपांडे :

नाशिकच्या भूमीत जन्माला आलेले हरी खंडेराव देशपांडे यांचे सुपुत्र गोविंद हरी देशपांडे हे नासिक लोकसभा मतदारसंघाचे पाहिले खासदार… त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०२ सालचा.. त्याकाळचे टिळक राष्ट्रीय विद्यापीठाचे पदवीधर. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सचिव , मुंबईचे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. सविनय कायदे भंगाच्या चळवळीत अटक होऊन दिड वर्षाची शिक्षा भोगून आलेले आणि भारत छोडो चळवळीत पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. एक स्वातंत्रवीर ते समाजसेवक अशी त्यांची ओळख. शेतकरी चळवळ , हरिजन , आदिवासी आणि गरीब जनतेसाठी कळवळा असलेले नेतृत्व काही काळ नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पदही भूषवले.

…………..

 

 

त्या वेळी काँग्रेसला ४५% मत मिळाली.एक आवर्जून सांगावेसे वाटते की महीला खासदार संख्या २४ होत्या . अनामत रक्कम जप्त झालेल्यांची संख्या ७४५ होती…

अपुऱ्या संसाधनांच्या काळात अनुभव नसताना आपली पहिली लोकसभा यशस्वी होऊ शकते,तर प्रगत भारतात आज कुठे काय हरवले? एकूण मतदानाची टक्केवारी लक्षात घेता, जागावाटप फॉर्म्युला अद्यापही त्रेधा स्थितीत

प्रंचड साधन संपत्ती विनियोगचा प्रयोग मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत नाहीये.

खरी लढाई नैतिकतेची अनैतीकतेसोबत तर नाही ना.ढासळती वैचारिक पातळी नव्या १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना एक वैचारिक प्रदूषणाच्या दलदलीत तर टाकत नाही ना.. या विषयी विचार मंथन व्हायला हवे.

कारण पहिली लोकसभा ही मतदाराने फक्त आपण आपले सरकार चालवू शकतो, मतपेटीतून योग्य माणसाला न्याय देवून की जो आपल्याला योग्य न्याय देईल… ही भावना साक्षरता दर मजल करत जशी वाढत गेली तसतशी लोप पावत चालली आहे..

    (क्रमशः)

                                          रश्मी मारवाडी, सिन्नर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *