*चौथा स्तंभ समाजाला पुढे घेऊन जाईल ;*प्रसार माध्यमे आणि राज्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे : मंत्री रक्षा खडसे*
*चौथा स्तंभ समाजाला पुढे घेऊन जाईल ;*प्रसार माध्यमे आणि राज्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे : मंत्री रक्षा खडसे*
शिर्डी { प्रतिनिधी }
समाजाची उन्नती होण्यासाठी तसेच समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपापले योगदान लाभले पाहिजे. या अनुषंगाने सर्व पत्रकार बांधव काम करत असतात. प्रसार माध्यमांनी आणि राजकारण्यांनी एकत्र येत राज्यासाठी, देशासाठी
नवनिर्माण करून आपण सर्वांनी चांगले काम हाती घेऊयात असे प्रतिपादन क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. त्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय दर्जाची नामांकित संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी त्या बोलत होत्या. पत्रकार आणि राज्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे यातूनच समाजाला पुढे नेता येईल असा विश्वास खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. संघटनेला आणि पत्रकारांना शुभेच्छा देत असताना पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही त्यांनी आश्वासित केले.