*सुदृढ लोकशाही दुसऱ्याचे प्रश्न सोडवू शकते* ; गोरक्षनाथ गाडीलकर
*सुदृढ लोकशाही दुसऱ्याचे प्रश्न सोडवू शकते* ; गोरक्षनाथ गाडीलकर
शिर्डी ( प्रतिनिधी )
पत्रकारांनी समाजातील विषमता हेरून आपली भूमिका चोख पडावी. लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ पत्रकारिता आहे. समाजाला न्याय देण्याचे काम पत्रकार करीत असतात. पत्रकार दुसऱ्याचे प्रश्न सोडू शकतात, पण स्वतःचे प्रश्न सोडवू शकत नाही. यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून आयुष्याचे टेकर असलेले संदीप काळे यांनी पत्रकारांना न्याय देण्यासाठी एकात्मिक मजबूत संघटन निर्माण करण्याचे काम केले. पत्रकार संघटनेने सतत कार्यरत राहिले पाहिजे. लोकशाहीलाही सुदृढ करण्याचे काम पत्रकार करत असतात म्हणूनच सुदृढ लोकशाहीतूनच समाजाचे आणि दुसऱ्याचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास साईनाथ
संस्थेचे मुख्य कार्यकारी विश्वस्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी व्यक्त केले. साईनाथ संस्थेच्या वतीने पत्रकारांना वैद्यकीय मदत दिली जाईल असेही ते म्हणाले.