*पत्रकार आणि शेतकऱ्यांची अवस्था सारखीच ; रविकांत तुपकर* [ आता केवळ पत्रकारांवर विश्वास आहे ]
*पत्रकार आणि शेतकऱ्यांची अवस्था सारखीच ; रविकांत तुपकर*
[ आता केवळ पत्रकारांवर
विश्वास आहे ]
शिर्डी प्रतिनिधी
Advertisement
आजही विपरीत परिस्थितीत पत्रकार जगत आहेत. पत्रकारांना माणूस म्हणून आपण कधी बघणार आहोत. त्यासाठी मजबूत संघटना पाठिशी हवी. संघटन मागे राहिले तरच राज्यकर्त्यांचा, नेत्याचा द्ष्टिकोन बदलेल आणि तो बदलला गेला पाहिजे. युनिटीत खरी ताकद आहे. पत्रकारिता आणि पत्रकार जिवंत राहिले पाहिजे. आपल्या अंगी विद्रोहाचा कीडा असायलाच हवा. बंड हा आपला स्थायी असावा, पत्रकारांनी तो कदापि सोडू नये असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. व्हॉइस मीडिया आयोजित शिर्डी येथील अधिवेशन प्रसंगी ते बोलत होते. रविकांत तुपकर म्हणाले की, प्रस्थापितांना हलवायचे असेल तर संघटनच कामी येत असते. प्रस्थापितांना गांधी कळत नाही, भगतसिंहांची भाषा कळते. संघटनेची पोकळीच व्हाईस ऑफ मीडिया भरून काढेल असा आशावाद व्यक्त करतांना ते म्हणाले की, पत्रकारांच्या विरोधात बोलण्याची हिंमतच झाली नाही पाहिजे. आपण एकमेकांवर अविश्वास दाखवतो. तर दुसरीकडे जाती, धर्माच्या संघटनेत आघाडीवर असतो. परंतु पत्रकार संघटनेत एकत्रितपणा करू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकार आणि शेतकऱ्यांची अवस्था सारखीच असून आता केवळ पत्रकारांवरच विश्वासाची भिस्त कायम असल्याचे तुपकर यांनी सांगितले.