ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोषक आहार म्हणून विद्यार्थिनीला मिळाले सडके अंडे   पवन नगर येथील आर बी एच प्राथमिक विद्यालयातील प्रकार


पोषक आहार म्हणून विद्यार्थिनीला मिळाले सडके अंडे 

 

 पवन नगर येथील आर बी एच प्राथमिकविद्यालयातील प्रकार

 

 

नितीन चव्हाण /सिडको  :-

Advertisement

 

सिडको परिसरातील सावता नगर या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडलाय…. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित आर बी एच प्राथमिक विद्यालय हे सिडकोतील पवन नगर या भागात आहे या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत… मात्र या विद्यालयात आज एक धक्कादायक प्रकार घडलाय आरुषी सागर कांबळे ही विद्यार्थिनी इयत्ता चौथीच्या वर्गात बी तुकडी मध्ये शिक्षण घेत आहे नेहमीप्रमाणे पोषक आहार म्हणून काही ना काही खाण्यास दिले जाते मात्र आजच्या दिवशी बोईल केलेली अंडी देण्यात आली होती आरुषीने ते अंडी घेतले व फोडण्यास सुरुवात केली फोडल्यानंतर त्यातून गढूळ पाणी निघाले व बोईल केलेल्या अंड्याची अवस्था बघता त्यामध्ये बारीक बारीक किडे हे दिसून आले आरुषीने ते न खाता तसेच डब्यात ठेवले व सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आरुषीचे पालक तिला घेण्यास आले पालकांनी आरुषीला विचारले असता की तू जेवण केले की नाही घडलेला प्रकार सांगितला त्यावरून संतापलेल्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे ऑफिस गाठले मात्र आरुषीच्या वडिलांना कोणीही भेटले नाही त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला या शाळेचे तसेच संस्थेचे संचालक अपूर्व हिरे यांना विचारले असता त्यांनी या घटनेबाबत अशी माहिती दिली की या पोषण आहाराशी संस्थेचा काही संबंध नसून शासनाकडून येणाऱ्या पोषण आहाराची जबाबदारी ही शासनाकडे आहे या संपूर्ण बाबतीत त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे संपूर्ण बाबीकडे आता सिडको वासियांचे तसेच पालकांचे लक्ष लागून आहे नेमकं ही कारवाई कोणावर होणार हे बघ ना आता महत्त्वाचं ठरणार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *