बाह्य शक्तीचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही- संजय फड
शिवसेनेमध्ये कोणतेही गैरसमज नाहीत
बाह्य शक्तीचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही- संजय फड
संगमनेर-प्रतिनिधी
खोट्या थापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने ईडी व सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडला आहे. भाजपाला अनेक गद्दार सामील झाले असून निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गैरसमज पसरवण्यासाठी काही बाह्य शक्ती काम करत आहेत, मात्र अशा पाशवी शक्तीचा बिमोड करून भाऊसाहेब वाकचौरे यांना राज्यातून सर्वाधिक मताने निवडून आणू असे संगमनेर तालुका शिवसेनाप्रमुख संजय फड यांनी सांगितले.
शिवसेनेकडून प्रतिक्रिया देताना तालुकाप्रमुख फड म्हणाले की, दोन दिवसापूर्वी तालुक्यातील पदाधिकारी व शाखाप्रमुख आणि बूथप्रमुखांची मीटिंग संपन्न झाली. यावेळी समन्वयक जगदीश चौधरी, वानखेडे पाटील , महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, शहर प्रमुख आप्पा केसेकर ,साळगट, कैलास वाकचौरे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मीटिंग अत्यंत सुरळीत आणि हसत खेळत सुरू असताना या मीटिंगमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करून प्रसिद्धी माध्यमांकडे देण्याकरता बाहय शक्तींच्या हस्तक्षेपावरून गोंधळ घालण्यात आला. तालुक्यातील काही गद्दारांनी या बैठकीमध्ये गोंधळ घालून आपले फोटो प्रसिद्ध होतील याकरता काम केले. या प्रसिद्धी मधून त्यांना मोठा आर्थिक लाभ झाला असेल मात्र घरातले वाद हे घरात मिटवले पाहिजे त्याची बाहेर वाचताना हे तत्व या घरभेदीनी पाळायला पाहिजे होते. मात्र ते आमिषाला बळी पडले.अशी गैर कृत्य जो करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यात येईल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राज्यांमध्ये मोठी सहानुभूती आहे. उद्धवजी ठाकरे यांना मोदीसह दिल्ली सरकार घाबरले आहे. त्यामुळे शिर्डी मतदार संघात शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. मात्र शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी आता सोबतीला आहे.
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आता गद्दारीला माफी नाही असे सांगताना शिवसेनेमध्ये कोणतीही गटबाजी नाही असे ठाम मत तालुका प्रमुख संजय फड यांनी व्यक्त केले असून आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांनी भूलथापांना बळी न पड
ता पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले आहे.