ताज्या घडामोडीसामाजिक

नासिक सिविल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या शिबिरात जिल्ह्यातील 230 दिव्यांगांना रेल्वे सवलत प्रमाणपत्रचा लाभ


नासिक सिविल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या शिबिरात जिल्ह्यातील 230 दिव्यांगांना रेल्वे सवलत प्रमाणपत्रचा लाभ

 

सिन्नर प्रतिनिधी

रामदासजी खोत संपर्कप्रमुख तथा महासचिव महाराष्ट्र राज्य प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली

Advertisement

सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे सर्व पदाधिकारी व नाशिक जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांच्या अथक प्रयत्नाने नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी सिव्हिल हॉस्पिटल नासिक येथे रेल्वे सवलत प्रमाणपत्र आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांनी वर्तमानपत्र व व्हाट्सअप द्वारे सर्व दिव्यांग बांधवांना रेल्वे सवलत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला साथ देत सिन्नर तालुका,निफाड तालुका, नाशिक रोड ,चांदवड ,नाशिक तालुका पेठ ,सुरगाण येथील दिव्यांग बांधव नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी जमा झाले . या शिबिरासाठी नासिक तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ कागणे यांनी सर्व दिव्यांग बांधवांना नाष्ट्याची व पाण्याच्या बॉटल ची सोय केली होती. या शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. दुधाडिया ,डॉ. कुटे, डॉ.नायडू आगवणे , निर्मला मॅडम ,श्रीमती कविता जुनेजा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांनी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अगदी सूक्ष्म असे नियोजन करून 230 दिव्यांग रेल्वे सवलत प्रमाणपत्राचे वाटप केले . रेल्वे सवलत प्रमाणपत्र शेवटच्या दिव्यांगापर्यंत मिळण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला. गेला. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी कार्याध्यक्ष संदीप आव्हाड ही सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत सिविल हॉस्पिटल येथे उपस्थित होते. याप्रसंगी दिव्यांग अनिल बोराडे दत्ता बोराडे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *