मुलाच्या शालेय प्रवेशासाठी जाणाऱ्या मातेचा करून अंत
मुलाच्या शालेय प्रवेशासाठी जाणाऱ्या मातेचा करून अंत
सिडको प्रतिनिधी :-
मुलाच्या प्रवेशासाठी केंद्रीय विद्यालयात जाणाऱ्या मातेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गौसिया मुजाहिद शहा (वय ३०, रा. तुळजाभवानी चौक जुने सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दिनांक ५ एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारच्या वाजेच्या सुमारास पाथर्डी येथून वडनेर गेटकडे स्वतःच्या दुचाकीने जात होत्या. यावेळी पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तसेच डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी उपनगर तसेच इंदिरानगर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यांच्या पश्चात पती, व मुलगा असा परिवार आहे