छगन भुजबळ यांचा पराभव करणार – करन गायकर
मराठा आरक्षणाला विरोध करणारे भुजबळ हे जातीयवादी नेतृत्व;
त्यांना पराभूत करणारच : करण गायकर राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
नाशिक :प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ जातीयवादी नेतृत्व ठरले आहेत.त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे.मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम भुजबळांनी केले आहे.नाशिकच काय,भुजबळ कुठूनही व कोणत्याही निवडणुकीसाठी उभे राहिले,तर त्यांच्या विरोधात उमेदवारी करून त्यांना पराभूत करणारच,असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार महायुतीचा अजून
जाहीर होईना.त्यामुळे राज्यातील मोजक्या मतदारसंघांमध्ये नाशिकचे नावदेखील सहभागी झाले आहे की,ज्या जागेबाबत अद्याप काही निर्णय होत नाही.महायुतीकडून प्रारंभी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव आघाडीवर होते.त्यानंतर मनसे नेते आणि भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर नाशिकमधून मनसेचा
उमेदवार असेल,अशी अटकळ बांधली जात होती.परंतु दोन दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री,ओबीसी नेते असतील, अशी चर्चा अशी सुरू झाली आहे.दुसरीकडे नाशिकमध्ये तिन्ही आमदार भाजपचे आणि महापालिकादेखील भाजपच्या ताब्यात होती.त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी,अशी भाजप पदाधिकारी सातत्याने मागणी करत आहेत.हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन-तीन वेळा जोरदार लॉबिंगही केले.नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसेंची उमेदवारीदेखील जाहीर केली होती.परंतु अद्यापही नाशिकच्या जागेबाबत भिजते घोंगडे कायम आहे.त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमधून भुजबळ निवडणुकीला सामोरे जातील ही चर्चा सुरू झाली आहे.मराठा आरक्षणाला आणि विशेषतः जरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांनी अनेक बाबींमध्ये अडचणीत आणल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी केला.तुमचे खासदार गोडसे जर कार्यसम्राट आहेत,तर भुजबळांना का उमेदवारी देत आहात? भुजबळांच्या उमेदवारीमागे भाजप शिंदे गट शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी या सगळ्यांचा हात असल्याचा थेट आरोपही गायकर यांनी केला. छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाचा रोज हे तिन्ही पक्ष स्वतःवर ओढून घेत आहेत. मराठा समाजात भुजबळांविषयी प्रचंड रोशन असताना नाशिक लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात मराठा मतदान असताना सुद्धा छगन भुजबळ यांच्या उमेदवारीचा हट्ट जर धरला तर भुजबळ यांना पराभूत करणारच,असा इशाराही त्यांनी दिला.
कोट – छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास महायुतीला याची जबर किंमत मोजावी लागेल.राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांत आम्हीआमचे उमेदवार उभे करून आमची मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ. भुजबळ यांनी मराठा समाजाला डिवचण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून केले आहे.त्यामुळे भुजबळ हे नाशिक,येवला किंवा कुठूनही उभे राहिले,तरी त्यांचा यंदा पराभव करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील हे नाशिकचा मराठा समाजाचा उमेदवार जाहीर करणार आहे.
– करण गायकर,
राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा