क्राईमताज्या घडामोडी

नोंदणीकृत विवाह करुन पत्नीचा दर्जा द्या अथवा गुन्हा दाखल करा


विवाहाचे आमिष दाखवून आदिवासी महिलेवर वारंवार बलात्कार

– नोंदणीकृत विवाह करुन पत्नीचा दर्जा द्या अथवा गुन्हा दाखल करा

अन्याय अत्याचार निर्मुलन समितीची मागणी

सिन्नर (प्रतिनिधी)

Advertisement

सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील एका सवर्ण समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिने आदीवासीं समाजातील एका महीलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला, त्यातून एका मुलीला जन्म दिला गेला असुन यानंतर सदर व्यक्ती कडून विवाह करण्यास नकार देण्यात आला . संबंधित व्यक्ती विरुद्ध पीडित मुलीने व तिच्या आई – मामाने अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र जाधव यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली असून त्याची गंभीर दखल घेत रविंद्र जाधव, तालुकाध्यक्ष संदीप भालेराव, जिल्हा सल्लागार ऍड.शुभांगी मोरे, महिला तालुकाध्यक्षा मंगलताई गोसावी, सिन्नर शहराध्यक्ष प्रीयंका व्दिवेदी, तालुका कार्याध्यक्ष शशीकांत अढागळे, पीडित मुलीचे मामा बाळु वाघ व आई सिंधु गायकवाड यांनी वावी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पिडीत मुलगी अनुसूचित जमातीतील असुन तिला पांढरपेशी प्रतिष्ठित व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून दिड दोन वर्ष घरात ठेवून तिच्यावर बेकायदेशीर बलात्कार केला. ती गर्भवती राहीली व तिने लग्नाची मागणी केल्याने तिला घरातुन मारहाण करून हाकलुन देण्यात आले. या अत्याचारातून तिला एक कन्यारत्न प्राप्त झाले असून आता सदर व्यक्ती तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देत आहे.त्या गुन्हेगाराला सजा म्हणून संबंधित गावचे सरपंच व पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचे मध्यस्थीने ५ एप्रिल पर्यन्त पीडित महिलेसोबत नोंदणीकृत लग्न लावून तिला व मुलीचा व्यवस्थित सांभाळ न केल्यास अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधात्मक कारवाई व लग्नाचे आमिष दाखवून सतत बलात्कार करणे तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी समिती तर्फे करण्यात आली आहे. संबंधित पीडितेस न्याय मिळाला नाही तर सिन्नर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीमार्फत लोकशाही कायदेशीर व सनदशीर मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल , असा इशारा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *