ताज्या घडामोडी

अमृतवाहिनी आयटीआयच्या 256 विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये नोकऱ्या


अमृतवाहिनी आयटीआयच्या 256 विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये नोकऱ्या

संगमनेर (प्रतिनिधी)-

उच्च तांत्रिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामुळे राज्यात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी आयटीआय मधील 256 विद्यार्थ्यांना महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस, टाटा मोटर्स यांसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी मिळाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.

Advertisement

 

याबाबत अधिक माहिती देताना भाटे यांनी सांगितले की मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय मध्ये विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे . याचबरोबर स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने सातत्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय करून विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात आहे यामधून यावर्षी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक येथे 30 विद्यार्थी, जापनीज कंपनी असलेल्या मोसंबीची बेल्टिंग इंडियामध्ये 43 विद्यार्थी, मोनोक ऑटोमेशन पुणे येथे 29 विद्यार्थी, पुणे येथे 27 विद्यार्थी, शारदा मोटर्स पुणे येथे 19 विद्यार्थी, tvs मध्ये 13 विद्यार्थी ,एक्साइड बॅटरी मध्ये 26 विद्यार्थी, सेवा मोटर मुंबईमध्ये अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड चे 110 विद्यार्थी, फिटरचे 40 विद्यार्थी, मोटर मेकॅनिकल व्हेईकलचे 17 विद्यार्थी ,वायरमन 25 विद्यार्थी, आणि मेकॅनिक डिझेल या ट्रेड चे 64 विद्यार्थी असे एकूण 256 विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाली आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे ,विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ जे बी गुरव, प्राचार्य विलास भाटे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *