अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन २०२४; छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबादसह महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार, क्षेत्रातील संधीवर चर्चासत्र ;
….
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन २०२४; छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबादसह महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग
कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार, क्षेत्रातील संधीवर चर्चासत्र ;
नाशिक प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित परिसंवादातील पहिल्या सत्रात कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे लेखक डॉ गिरीश जाखोटिया, कोकणात ग्लोबल कोकण ही उद्योजकतेची चळवळ चालविणारे संजय यादवराव, शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले आणि उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव यांनी सहभाग घेतला. त्यांची मुलाखत भाषण, कला, संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली.
अगदी छोट्या छोट्या स्किलपासून मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतला असून राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या कार्यकाळात ३०० उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे शशिकांत जाधव यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ गिरीश जाखोटीया यांनी उद्योजक जडण घडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक या अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेतीसंबंधीच्या अडचणी आणि शेती ही एक इंडस्ट्री असून त्याची योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावर मार्ग काढावा असे सांगितले. सरकारने योग्य त्या सवलती देऊन शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असल्याचे दाखवून दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जगभरात प्रसिध्द असलेल्या सह्याद्री फ्रार्म्सचे संस्थापक विलास शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतिशील शेतकरी निर्माण केल्याचे सांगून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याचे सांगितले. सह्याद्री फार्म्सचा आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन, आर्थिक नियोजन, सामूहिक प्रयत्न कारणीभूत ठरल्याचे सांगितले. संजय यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगतांना कोकणातील परिस्थिती वर्णन केली. कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनींचा वापर करावा ना की विकावी असे आवाहन त्यांनी केले.
या अधिवेशनात छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली. नाना बच्छाव, योगेश नाटकर व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके, अशोक दुधारे, अशोक कदम, संजय फडोळ, राजाभाऊ जाधव, दीपक पाटील, रमेश खापरे, अनिल आहेर, सागर बागुल, सागर कातड, आण्णा पिंपळे, विलास गडाख, गौरव गाजरे, वैभव वडजे, स्वाती जाधव, शोभा सोनवणे, ॲड. स्वप्ना राऊत, ओमकार दुगजे, विश्वास वाघ, राम निकम, मंगेश पाटील, प्रल्हाद जाधव, नितीन काळे, सुवर्णा पाटील, रोहिणी उखाडे, सचिन पवार, संदीप बर्हे, राज पाटील, अनिता ढेमसे, प्रमिला पाटील, हेमंत देशमुख, विष्णू अहिरे, गणेश पाटील, महेंद्र बेहरे, प्रितेश रायते, राजेंद्र देवकर आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर, त्रिलोक भामरे, समीर वडजे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले.