आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराला माझी वसुंधरा योजनेतून 1.5 कोटींचे बक्षीस – सौ दुर्गाताई तांबे
आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराला माझी वसुंधरा योजनेतून 1.5 कोटींचे बक्षीस – सौ दुर्गाताई तांबे
संगमनेर (प्रतिनिधी) –
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व नागरिकांच्या सुविधा या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमनेर नगरपरिषदेने केलेल्या कामाबद्दल यावर्षीच्या राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानातून दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असल्याची माहिती मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणातील बदल या विभागाच्या वतीने नागरी सुविधांसमवेतच वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन यांचा विविध सुविधांचे परीक्षण त्रयस्थ समितीच्या वतीने करण्यात आले.
नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने मागील दहा वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले आहे संगमनेर हे आता वृक्षांचे शहर म्हणून राज्यात ओळखले जाऊ लागले आहे यामुळे ऑक्सिजन हब निर्माण झाला असून अनेक नागरिकांची शहरात राहण्यासाठी मोठी पसंती आहे. याचबरोबर 24 तास मुबलक स्वच्छ पाणी, अत्याधुनिक व उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, शांत व संस्कृत वातावरण, सर्वधर्मसमभाव, याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सातत्याने विविध विकासाच्या मोठमोठ्या योजना राबवल्या आहेत
हायटेक बस स्थानक, बायपास प्रवरा नदीवर विविध पूल, विविध अत्याधुनिक शासकीय कार्यालय, नव्याने उभारलेले 27 गार्डन, गंगामाई घाट सुशोभीकरण, याचबरोबर हजारो कोटींची उलाढाल करणारी समृद्ध बाजारपेठ हे शहराचे वैशिष्ट्य असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याकरता सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेने सातत्याने काम केले आहे.
या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाने राज्यस्तरीय उत्तेजनार्थ दीड कोटींचे बक्षीस संगमनेर नगर परिषदेला दिले आहे.
हे बक्षीस मिळाल्याबद्दल संगमनेर मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
सततच्या कामाचा हा सन्मान- सौ तांबे
हरित संगमनेर स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर ही संकल्पना राबवताना मागील दहा वर्षात वृक्षारोपण व संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्यात आले याचबरोबर स्वच्छ व सुंदर संगमनेरसाठी नगरपरिषदेने सातत्याने विविध उपक्रम राबवले यामध्ये शहरातील नागरिक व महिला यांनी मोठा सहभाग घेतला असून या सर्वांच्या सहभागातून संगमनेर नगर परिषदेच्या राज्य व देश पातळीवर अनेकदा सन्मान झाला हा सन्मान येथील नागरिकांचा असून माझी वसुंधरा अभियानातून मिळालेले हे बक्षीस सततच्या कामाचे असल्याचे प्रतिपादन सौ दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराला माझी वसुंधरा योजनेतून 1.5 कोटींचे बक्षीस – सौ दुर्गाताई तांबे

