ताज्या घडामोडीराजकीय

मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर… 


मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर… 

नाशिक लोकसभेची जागा भाजपनेच लढवावी 

 

दिनकर पाटील यांची पक्षनेतृत्वाकडे आग्रही मागणी 

 

 

नाशिक प्रतिनिधी 

देशाच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यासपूर्वक विचार केला तर सर्वसामान्य माणसाच्या मनावर नरेंद्र मोदी यांचे नांव आदराने कोरले गेले असून मागील दहा वर्षातलं त्यांचं काम आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे सर्वसामान्य मतदार हा २०२४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पहावयास उत्सुक आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीन या निवडणूकीत ४०० पार जागांचा नारा देत त्यादृष्टीने व्यूहरचना करत क्षमता असणारे योग्य उमेदवार देण्यास सुरूवात केली असून नाशिक लोकसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल आल्याने महायुतीत ही जागा भारतीय जनता पक्षाने लढवावी अशी मागणी मनपा सभागृहाचे नेते दिनकर पाटील यांनी केली आहे.

 

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिनकर पाटील यांनी म्हटले आहे कीं,आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर मतदानाला अवघे काही दिवस बाकी असतांना अजूनही महायुतीच्या उमेदवाराबाबत संभ्रमावस्था कायम आहे. युतीतील घटक प्रक्षांचे दावे-प्रतिदावे यात हा मतदारसंघ अडकल्यामुळे महविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आज दिसत आहे. अनेक निवडणूका लढविलेल्या आणि राजकारणाचा चांगला अभ्यास असलेल्या छगन भुजबळ यांनी याच कमी असलेल्या वेळेचा आणि एकुणच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करीत माघार घेणे पसंत केले. भुजबळ यांच्या माघारीमुळे नाराज असलेल्या ओ.बी.सी. बांधवांना संघटित करणं हेही या थोड्या काळातील मोठे आव्हान आहे. यातून एक संदेश हा जातो की सध्याची राजकीय परिस्थिती ही इतर कोणत्याही पक्षापेक्षा भारतीय जनता पक्षाला जास्त अनुकुल आहे. या गणीतामागे असलेली कारणंही अगदी स्पष्ट आणि कोणतीही साशंकता नसलेली आहेत.

Advertisement

 

मागील दहा वर्षांपासून भाजपाचे असलेले तीन आमदार, महानगरपालिकेत निम्याहून अधिक नगरसेवक, महानगरपालिकेतील सत्ता, शेजारच्या त्र्यंबक नगरपालिकेतील सत्ता, पक्षाचं मतदारसंघाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत असलेलं संघटन, भाजपाला मानणारा मोठ्या प्रमाणात असलेला वर्ग आणि सोबत असलेलं मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचं सर्वमान्य नेतृत्व. याच सर्व गोष्टींचा विचार करीत भाजपा कोअर कमिटीचे सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, आमदार, नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी पक्षाच्या शिर्षस्थ नेतृत्वाला महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडविण्याची मागणी केली. कोणत्याही अवास्तव गोष्टींचा विचार न करता अत्यंत अभ्यासपूर्वक आणि पक्षाकडून झालेल्या अनेक सर्वेक्षणांच्या आधारे नाशिक लोकसभेत फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो ही वस्तूस्थिती वेळोवेळी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहचविली होती.एकूण परिस्थिती लक्षात घेऊन ही जागा भाजपनेच लढवावी.

 

 

“पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागील तीन वर्षांपासून मी नाशिक लोकसभा मतदारसंघ किमान चार वेळा पिंजून काढला असून प्रत्येक भागातील नागरिकांशी आजही माझा विविध माध्यमातून नित्य संपर्क आहे. सहा विधानसभा क्षेत्रांचा हा मतदारसंघ उरलेल्या २०-२५ दिवसात फिरून प्रचार करण्यासारखा नाही हे आजचे सत्य आहे. माझा सर्व मतदारसंघातील नागरिकांशी असलेला संपर्क, संपूर्ण मतदारसंघाचा मी केलेला अभ्यास, नित्य भेटीगाठी, यातून जाणलेले विद्यमानांबद्दलचे मत यामुळे एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे नाशिक लोकसभेची जागा भाजपा सोडून इतर कोणत्याही पक्षाला व त्या पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला मिळणं म्हणजे पराभवाला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे ठरेल. हीच गोष्ट भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्यासाठी आणि नरेंद्र तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पाहण्याच्या स्वप्नांना अडचणीची ठरणारी आहे.

प्राप्त परिस्थितीचा गांभिर्यपूर्वक विचार करीत कोणतेही दावे-प्रतिदावे न होता नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटावी. हा फक्त माझाच नाही तर पक्षाचे कोअर कमिटीचे सदस्य, आमदार, सर्व मंडलाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी आणि समस्त नाशिककरांचाही आग्रह आहे.”

 

दिनकर धर्माजी पाटील

 

माजी सभागृह नेता तथा नगरसेवक, नाशिक मनपा

प्रदेश निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *