कार्यसम्राट संस्थेकडून १०००महिला, मुलांना देणार कराटे व नृत्य प्रशिक्षण
कार्यसम्राट संस्थेकडून १०००महिला, मुलांना देणार कराटे व नृत्य प्रशिक्षण
२५ ते २७ एप्रिलदरम्यान मोफत शिबिराचे आयोजन
नाशिक:प्रतिनिधी |
अनेकदा महिला, तरुणी यांना रात्री एकट्याने प्रवास करावा लागतो, अशा काळात आलेल्या संकटाशी दोन हात करता यावेत यासाठी कार्यसम्राट फाउंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.संस्थेतर्फे २५ ते २७ एप्रिलदरम्यान तीन दिवस मोफत कराटे तसेच नृत्य, कथ्थक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून पाश्चात्य नृत्य-राम मोरे,कथ्थक-सागर बोरसे,कराटे-संदीप सोनवणे हे मार्गदर्शन करणार करणार आहे.त्यात १००० हून अधिक महिला, मुली आणि सर्वच वयोगटातील मुलांना स्वसंरक्षणाबरोबर नृत्याचेही धडे देण्यात येणार आहेत. कार्यसम्राट फाउंडेशनतर्फे विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. शाळा-महाविद्यालयांना सुट्या माध्यमातून २५ ते २७ एप्रिलदरम्यान मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. मखमलाबादा नाका परिसरातील कार्यसम्राट फाउंडेशन हॉल येथे हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. सध्या गुन्हेगारी वाढली आहे. अनेकदा महिला, तरुणींना एकट्याने प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत येणाऱ्या संकटाशी त्यांना दोन हात करता यावेत, त्यांना स्वतःचे संरक्षण करता यावे,यासाठी त्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना प्रशस्तिपत्रकही देण्यात येणार आहे. त्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढविण्याबाबतही तज्ज्ञांकडून असल्यामुळे विविध प्रशिक्षण मार्गदर्शन केले जाईल. इच्छुक शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर फाउंडेशनच्या गीता शामसुखा यांनी पुढाकार घेत फाउंडेशनच्या महिला, मुलींनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यसम्राट फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता शामसुका,सचिव तुषार शामसुका,खजिनदार रुषभ शामसुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
*चौकट*👇
आजच्या काळात सर्व मुली तसेच महिलांना कराटे शिकण्याची खूप आवश्यकता आहे. मुलीवर अनेक अत्याचार होत असल्याचे आपणास बातम्याद्वारे बघायला मिळत असून सध्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी आणि कोणी चुकीचे वागत असेल अश्या व्यक्तींना कराटे प्रशिक्षण घेऊन धडा शिकविता येईल यासाठी मोफत कराटे प्रशिक्षण प्रत्येक महिला व मुलीने घ्यावे.
गीता शामसुखा,
अध्यक्षा,कार्यसम्राट फाउंडेशन नाशिक.