जरांगे पाटलांना आव्हान देण्याआधी दोन दारुण पराभव आठवा ; करण गायकर यांचे छगन भुजबळांना प्रतिउत्तर
*जरांगे पाटलांना आव्हान देण्याआधी दोन दारुण पराभव
आठवा ;
करण गायकर यांचे छगन भुजबळांना प्रतिउत्तर
नाशिक प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ यांनी काल काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आव्हानात्मक भाषा वापरली,त्या छगन भुजबळांना व त्यांच्या पुतण्याला नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी लोकसभेच्या मागील निवडणुकीमध्ये दोनदा लाखोंच्या मताधिक्याने पराभव पहायला लावलेला आहे, तसेच यावेळी गुडघ्याला बाशिंग बांधून नाशिक लोकसभेची तयारी केलेल्या भुजबळांना साधी उमेदवारीही दिली नाही हे भुजबळांनी विसरू नये किंवा तो विसरण्याचा प्रयत्नही करू नये.अशा शब्दात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आणि जरांगे यांचे कट्टर समर्थक करण गायकर यांनी प्रतीउत्तर दिले आहे.
मंत्री भुजबळ यांनी शुक्रवारी वृत्त वाहिन्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांना येवला विधानसभा मतदार संघात समोरासमोर लढण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा खरपूस समाचार घेताना, करण गायकर म्हणाले,
छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजाचा द्वेष करत आलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत.आणि त्याचीच जाणीव ठेवत, मराठा समाजाने त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा लाखोंच्या मताने पराभव दाखवलेला आहे. आता छगन भुजबळ पुन्हा एकदा येवल्यातून जरांगे पाटलांनी मला पाडायची भाषा करण्याऐवजी त्यांनी स्वतः या निवडणुकीत उभे राहावे, असे केविलवाणे आव्हान जरांगे पाटलांना देण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु छगन भुजबळ यांना आम्ही नाशिक जिल्ह्यातून सबंध मराठा समाजाच्या वतीने सांगू इच्छितो की तुम्हाला पाडण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची गरज पडणार नाही.तुम्हाला येवला लासलगाव मतदार संघातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मराठा समाजाचा कुणीही व्यक्ती या निवडणुकीत तुमचा पराभव करेल. कारण आता मराठा समाजासह सर्व जाती धर्मातील लोकांना तुमचा जातिवाद लक्षात आला आहे.त्यामुळे तुम्ही असली विधान करून स्वतःचे हसू करून घेऊ नये.
भुजबळांना आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने काही दिवसांपूर्वी नांदूर मधमेश्वर या ग्रामपंचायतीच्या उद्घाटन सोहळ्याला छगन भुजबळांना निमंत्रण दिलं नाही, म्हणून त्यांनी थेट सरपंचाच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. यातूनच छगन भुजबळ यांना त्यांचा पराभव दिसून येत आहे. त्यातूनच ते असे वैफल्यग्रस्त वक्तव्य करीत आहेत.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने मराठा समाजाचा लढा लढत आहेत, भुजबळांना माहित आहे की आता मराठा आरक्षण शंभर टक्के मराठा समाजाला मिळणार आहे. मग आपल राजकीय अस्तित्व संपेल. या भीतीने ते सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. यात त्यांना यश येत नसल्याने ते थेट मनोज जरांगे पाटलांवर खोटे नाटे आरोप लावून स्वतःची उंची वाढविण्याचा तसेच सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात .परंतु त्यांना यात कधीच मराठा समाज यश येऊ देणार नाही.छगन भुजबळांचे हे आव्हान नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाने स्वीकारलेले आहे.येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला लाखोंच्या मताने पाडण्याचा संकल्प लासलगाव येवला मतदारसंघातील मराठा समाज बांधवांसह बारा बलुतेदार 18 पगड जातीतील लोकांनी केलेला असल्याकारणाने भुजबळांनी आता विजयाचे स्वप्न बघू नये .तसेच आतापर्यंत केलेला जातिवाद खूप झाला. यापुढे मराठा समाज किंवा इतर समाजाच्या विरोधात जातीयवाद करून राजकीय पोळी भाजण्याचे कृत्य भुजबळांनी थांबवावे अन्यथा मराठा समाज भुजबळांना कधीही माफ करणार नाही आणि राजकारणात तर परत विजयाचा गुलाल लागू देणार नाही.असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिला.