जानोरी येथे मंगळवारी 23 एप्रिलपासून श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह
जानोरी येथे मंगळवारी 23 एप्रिलपासून श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह
बेलगाव कुऱ्हे ( प्रतिनिधी )
इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथे मंगळवारी 23 एप्रिलला श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने तसेच हभप अशोक महाराज धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्तहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वर पारायण, 10 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, साडे सहा ते साडे आठ हरि कीर्तन, त्यानंतर परिसरातील गुणिजनांचे भजन जागर आदी कार्यक्रम होणार असून नामवंत किर्तनकारांचे कीर्तने होणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ आहेत. मंगळवारी 23 तारखेला हभप सुदाम महाराज घाडगे, महंत अचलपूरकर बाबा, प्रभाकर महाराज, सागर महाराज दिंडे, माधव महाराज घुले, जगदीश महाराज जोशी, अशोक महाराज धांडे, मंगळवारी 30 तारखेला सकाळी 9 ते 11 अमोल महाराज बडाख यांचे काल्याचे कीर्तन होईल यानंतर दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने सांगता होईल.