ताज्या घडामोडीसामाजिक

श्रेष्ठ कर्म हीच खरी शक्ती : ब्रह्माकुमारी पूनम दीदी


श्रेष्ठ कर्म हीच खरी शक्ती :
ब्रह्माकुमारी पूनम दीदी
जायंट्स कार्यकारिणीचा “शपथ व पदग्रहण” भव्य दिव्य सोहळा संपन्न

बाळासाहेब सोनवणे /नाशिक 
चांगल्या गोष्टी करत राहिलात तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगलेच फळ मिळवून देतात. म्हणूनच नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते.म्हणून आपली चांगली कृती हीच पूजा मानून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता,चांगले कर्म करा.भगवंत हा केलेल्या चांगल्या कर्मामुळेच प्रसन्न होत असतो. श्रेष्ठ कर्म हीच खरी शक्ती असल्याने सत्कर्म नि:स्वार्थपणे करत रहा,असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व-विद्यालयाच्या नाशिक जिल्हा वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले.

Advertisement

नाशिक येथे जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन संचलित जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक स्टार व यंग जायंट्स च्या शपथविधी व पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशन युनिट डायरेक्टर रंजना भावसार होत्या.यावेळी व्यासपीठावर स्पेशल कमिटी मेंबर विनोद शेवतेकर, स्पेशल कमिटी मेंबर सूर्यामाला मालानी, फेडरेशन अध्यक्ष अमित मालानी,सचिव पल्लवी मालानी,माजी फेडरेशन अध्यक्ष मेजर जगन्नाथ साळुंखे,नवनियुक्त अध्यक्षा कल्पनाताई सोनार,यंग स्टार अध्यक्ष गौरव सोनार,राजेंद्र चव्हाण,उपाध्यक्ष डॉ.प्रा. गुरुदत्त राजपूत, कोषाध्यक्ष सुमित गुप्ता आदी उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी श्री हिंगुलांबिका देवी व जायंनट्स इंटरनॅशनल चे संस्थापक स्व. नाना चुडासामा यांच्या प्रतिमेचे पूजन ब्रह्माकुमारी पूनम दीदी व पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले, जायंट्स ची सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.फेडरेशन डायरेक्टर रंजना भावसार यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मागील वर्षातील कार्याचा लेखाजोखा मांडला यावेळी केरळ येथील जागतिक अधिवेशनात कार्याची दखल घेत फेडरेशनने दिलेल्या स्मृतीचिन्ह सन्मानाचे वितरण राजयोगिनी  ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांच्या शुभहस्ते फेडरेशन संचालिका रंजना भावसार व नवनियुक्त अध्यक्षा कल्पनाताई सोनार व कार्यकारणीकडे प्रदान करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोद शेवतेकर,सूर्यमाला मालानी, अमित मालानी, जगन्नाथ साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मावळत्या अध्यक्षा रंजना भावसार यांनी नवनियुक्त ग्रूप च्या अध्यक्षा कल्पनाताई सोनार,यंग स्टार अध्यक्ष गौरव सोनार तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग कर्म./अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, डॉ.स्नेहा भावसार, कल्पना भावसार आदिंना पदाची शपथ दिली.यावेळी नूतन अध्यक्षा कल्पना सोनार आपल्या मनोगतांमध्ये जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून नाशिक शहर तसेच जिल्हाभरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रुप च्या सचिव प्राची उपग्नलावार यांनी केले.ग्रुप उपाध्यक्ष स्वाती अंधारे, रजनीश सोनार, डॉ.रुपेश भावसार, अजिंक्य जगताप, चंद्रकिशोर भारोटे,एडवोकेट सतीश भावसार, अश्विनी भावसार,प्रतिभा भावसार, मीना बोहाडे, सुनिता भावसार,विना भावसार, मीना भावसार, ज्योती भावसार,सुष्मिता भावसार,रामदास भावसार आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

*चौकट*
*जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षपदी कल्पना सोनार व यंग स्टार पदी गौरव सोनार*:-
सन २०२४ या वर्षासाठी जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक स्टारच्या अध्यक्ष कधी कल्पनाताई सोनार व यंग स्टार ग्रुपच्या अध्यक्षपदी गौरव सोनार तसेच कार्यकारिणी सदस्य पदी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर,कल्पना भावसार,डॉ. स्नेहा भावसार आदिंची नियुक्तीची घोषणा जायंट्स ग्रुपच्या फेडरेशन डायरेक्टर रंजना भावसार यांनी करत त्यांना पदाची शपथ देऊन पदग्रहण समारंभ करण्यात आला.नूतन कार्यकारिणीच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा
:- रंजना भावसार,फेडरेशन डायरेक्टर,
जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक स्टार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *