ताज्या घडामोडीसामाजिक

वृक्षारोपण करून खिंवसरा परिवाराने आई-वडिलांच्या स्मृतींना दिला उजाळा.


 

 

वृक्षारोपण करून खिंवसरा परिवाराने आई-वडिलांच्या स्मृतींना दिला उजाळा.

सिन्नर प्रतिनिधी 

सिन्नर येथील वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून किरण खिंवसरा व नितीन खिंवसरा हे दोघेही बंधू वर्षभर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य करत असतात. त्यांचे वडील स्वर्गीय मोतीलाल धनराज खिंवसरा हे राष्ट्रसेवा दलात समाजसेवेचे कार्य करत होते. तर त्यांच्या आई स्व.सुरजाबाई मोतीलाल खिंवसरा ह्या देखील विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असत. आपल्या आई वडिलांच्या कार्याचे वारसा पुढे ठेवत दोघेही बंधू पर्यावरण क्षेत्रात सतत कार्यरत असतात. गतवर्षी स्वर्गीय मोतीलाल धनराज खिंवसरा यांचे निधन झाले.तर आई स्व.सुरजाबाई मोतीलाल खिंवसरा यांचे 4 वर्षांपूर्वी निधन झाले. आई-वडिलांच्या स्मृतिदिनिमित्ताने अनावश्यक खर्च टाळत वनप्रस्थ फाउंडेशनला वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी आर्थिक मदत केली व अंबिका वन येथे सहपरिवाराने उपस्थित राहून वृक्षारोपण केले. याद्वारे खिंवसरा परिवाराने समाजासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. औद्योगीकरण व वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे. पर्यावरणाचे होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी नागरिकांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज बनली असून सर्व नागरिकांनी वृक्षारोपण व संवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशन द्वारे करण्यात आले.

Advertisement

श्री.किरण मोतीलाल खिंवसरा, श्री.नितीन मोतीलाल खिंवसरा, मुलगी श्रीम.शोभा सुभाष कर्नावट,(रा.नाशिक) सौ.मीना चंद्रकांत कर्नावट,(रा.पुणे), सून सौ.जयमाला किरण खिंवसरा, सौ.रेखा नितीन खिंवसरा, नातू श्री.हर्षल नितीन खिंवसरा, नातसून सौ.हनी हर्षल खिंवसरा,वनप्रस्थ फाउंडेशनचे राजेंद्र क्षत्रिय, दत्तात्रय बोऱ्हाडे, महावीर खिंवसरा, अभिजीत देशमुख, सुनील विशे,अनिल जाधव, हर्षल अनेराव, प्रसाद गडाख, योगेश खर्डे यांचे सह स्वयंसेवक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *