आषाढी एकादशी निमित्त सिन्नर आगारात विठ्ठल पूजन
आषाढी एकादशी निमित्त सिन्नर आगारात विठ्ठल पूजन
सिन्नर प्रतिनिधी
महाराष्ट्र भर वारकऱ्यांना विठू माऊलीला भेटण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे राज्य परिवहन मंडळ ही एक मौलिक कामगिरी बजावत असतो. याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशी निमित्त सिन्नर आगारात विठ्ठल पूजन करून विठ्ठलाची आरती घेत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत जय हरी विठ्ठल चा गजर करत आषाढी एकदशी निमित्त प्रवाशी बांधवाना फराळ वाटप करण्यात आले.
सुरेख अशी रांगोळी बरगाव पिंपरी येथील विद्यार्थिनी तनुजा व प्राजक्ता उगले यांनी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रसंगी आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, महामित्र दत्ताजी वायचळे,चौधरी महाराज ,देवाज ग्रुप अध्यक्ष योगेश भाऊ लोंढे,अमित रायते स्थानक प्रमुख सुरेश दराडे, देवा सांगळे वाहतूक निरीक्षक भरत शेळके, स.वाहतूक निरीक्षक अण्णा पवार, विक्रम शिंदे पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रकाश शिरसाट, संजय देशमुख, विकास पाटील , निलेश कर्पे, रवी कोठुरकर , शशी आंधळे,, शरद नरोडे ,, विलास केदार, बापू पवार, व्ही जी बोडके, रुखमनी चौरे, अलका शेळके, प्रतिभा चव्हाण , अर्चना पांगारकर,, दत्ता आंधळे लोकेश चांगले, विवेक कोकाटे,महेश सोनवणे आदी सह प्रवाशी बांधव उपस्थित होते.
*प्रसंगी रांगोळी काढणाऱ्या उगले भगिनी याना पुस्तक पेन भेट देऊन सन्मान केला.
*सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी केले*