ताज्या घडामोडी

महानुभाव पंथीय दिड्याना नोंदणी कृत दिंड्यांच लाभ देण्यात यावा –  समाज सेवक दत्ता भाऊ गोसावी


महानुभाव पंथीय दिड्याना नोंदणी कृत दिंड्यांच लाभ देण्यात यावा –  समाज सेवक दत्ता भाऊ गोसावी

 

सिन्नर प्रतिनिधी

Advertisement

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये साजरी होणार आहे याचेच अवचित साधून आपल्या देशात व राज्यात प्रथमच महाराष्ट्र शासनामार्फत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा होणार असून तसेच श्री क्षेत्र जाळीचादेव येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर असून या ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर असून या ठिकाणी राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भाविक भक्त लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात तसेच महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असल्यामुळे देशातून व राज्यातून स्वामींच्या अवतार दिनानिमित्त जाळीचा देव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यामुळे सर्व भाविक भक्तांची व जाळीचादेव मंदिराचे पुजारी मंडळी तसेच संत महंत वासनिक उपदेशी बांधव तपस्विनी तसेच राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यांची मागणी अशी आहे की सदर कार्यक्रमासाठी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी स्वामींच्या मंदिरामध्ये पूजा विधी चा कार्यक्रम मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )मा.श्री. अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र )तसेच केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यातील मंत्री यांच्या उपस्थित पार पाडावा ही भक्त जणांची इच्छा व मागणी आहे तसेच दरवर्षी माघ शु.15 माघ पौर्णिमेला जाळीचादेव या ठिकाणी खूप भव्य दिव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो सदर यात्रेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात यामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यांमधून दिंड्या (पदयात्रा) येत असतात दिंड्यांची संख्या अंदाजे 100 इतकी असू शकते या दिंड्यांचा प्रवास अंदाजे 400 ते 500 किलोमीटर इतका असतो प्रत्येक दिंडीमध्ये 500 ते 600 महानुभाव पंथीय भाविक पायी देवाला येत असतात यामध्ये महिलांची संख्या जास्त असते आषाढी एकादशी निमित्त नोंदणीकृत दिंड्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने 20 हजार रुपयांच्या अनुदान दिले आहे व यामध्ये वारकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयास पाच लाखांचा विमा देण्यात आला तसेच अपंगत्व झाल्यास 50 हजार रुपये व वारी दरम्यान आजारी पडल्यास औषधांसाठी 35 हजार शासनामार्फत देण्यात आले होते वरील प्रमाणे महानुभाव पंथीय यात्रेनिमित्त आलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना असाच लाभ देण्यात यावा ही विनंती तसेच भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त जनजागृती म्हणून जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालय गावांतर्गत प्रभात फेरी करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे या विषयाचे निवेदन श्रीमती रक्षा निखिल खडसे( युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री) यांना श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी (भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष) यांनी दिनांक 21/7/2024 रोजी दिले याच निवेदनाची प्रत डॉ. भारती पवार (मा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री) चित्रा वाघ (भाजप नेत्या) यांनाही देण्यात आली. अशा आशयाची
प्रत
1)मा. श्री .एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
2) मा.श्री. अमितजी शहा
(केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार)
3) मा. श्री. नितीन जी गडकरी साहेब
( केंद्रीय मंत्री)
4) मा.श्री. देवेंद्र फडवणीस साहेब (महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री)
5) मा. श्री. भूपेंद्र यादव
( महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी)
मा. श्री .पियुष जी गोयल
( केंद्रीय रेल्वेमंत्री)
मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब
( प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य)
मा.श्री .पंकजाताई मुंडे
(मा. मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *