ताज्या घडामोडीराजकीय

*जळगाव लोकसभेसाठी भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून करण पवार हे उमेदवार रिंगणात*


*जळगाव लोकसभेसाठी भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून करण पवार हे उमेदवार रिंगणात*

Advertisement

( *चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव*)
जळगाव लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा सस्पेन्स अखेर संपला असून जळगावच्या जागेसाठी पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करणत पवार यांच्या नावाची बुधवार दि. ३ एप्रिल रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. त्यामुळे आता भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरुद्ध करण पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे ही लढत आता काट्याची टक्कर होणार हे मात्र नक्की.
बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांनीही ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता उमेदवाराची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागणार आहेत हे मात्र निश्चित.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *