ताज्या घडामोडी

नंदुरबार दंगल: पोलीस वाहनांसह घरे जाळणाऱ्या 200 जणांविरोधात गुन्हा दाखल; 55 निष्पन्न आरोपी अटकेत; 23 पोलीस अधिकारी जखमी, 27 वाहनांचे नुकसान


नंदुरबार दंगल: पोलीस वाहनांसह घरे जाळणाऱ्या 200 जणांविरोधात गुन्हा दाखल; 55 निष्पन्न आरोपी अटकेत;

 

23 पोलीस अधिकारी जखमी, 27 वाहनांचे नुकसान

 

नंदुरबार -प्रतिनिधी 

काही जणांनी औरंगजेब व टिपू सुलतान यांचे छापील बॅनर्स मिरवणुकीत झळकावीले आणि त्यामुळे 19 सप्टेंबर रोजी नंदुरबार शहर तुफान दंगल उसळली, असे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. दरम्यान, शांतता प्रस्थापित झाली असली तरी पोलिसांकडून दंगलखोरांची धरपकड सुरू असून चार अल्पवयीन मुलांसह 55 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, जुलूस मिरवणुकीतील एक इसम वाहनावर लहान मुलांला त्याचे खांद्यावर घेवून उभा राहिला आणि फुले पुतळ्याच्या जवळ उभे राहुन मिरवणुक पाहणाऱ्या माळीवाडयाच्या परिसरातील लोकांकडे पाहून मुला करवी पहेलवानी दंड व पट थोपटत चिथावणी दिली. शिवाय काहीजणांनी औरंगजेब व टिपू सुलतान यांचे छापील बॅनर्स मिरवणुकीत झळकावीले व हातात एका विशिष्ठ धर्माचे झंडे घेवुन फडकवले आणि त्यावरून दोन गटात दंगल उसळली. तुफान दगडफेक करीत जाळपोळ करण्यात आली. पोलिसांना लक्ष बनवल्याने पोलिसांची वाहने आणि पोलिस अधिकारी क्षतीग्रस्त झाले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर जमाव आटोक्यात आला.

 

*27 वाहनांसह दुकाने घरे जाळली*

 

नंदुरबार शहरातील महात्मा फुले पुतळा, जवळ रा रहीम चौकी, ईलाही चौक, चिराग अली मशिद, भद्राचौक, बोडरा गल्ली, करीम मंजील, नवनाथ टेकडी शादुर्ला नगर, शाळा क्रमांक ९ व अन्य परीसरात तुफान दगडफेक करण्यात आली. प्रामुख्याने पोलिसांना देखील लक्ष बनवण्यात आले. प्रत्यक्ष पोलिसांवर आणि वाहनांवर हल्ला करताना दंगल घडवणाऱ्यांनी दगड, विटा, काचेच्या बाटल्या, धारदार हत्यार यांचा सर्रास वापर केला. पोलीस ठाण्यातील नोंदवलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, या हल्ल्यात ६ शासकीय वाहन २१ खाजगी वाहने तसेच काही दुकाने व घर यांचे जाळपोळ करुन नुकसान करण्यात आले. दिनांक १९/०९/२०२४ रोजी दुपारी 3 ते 5 वाजताच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. 

Advertisement

 

चौकट 

 

*दगडफेकीत 23 पोलीस जखमी*

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत एकुण २३ पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, अग्निशमक दलाचे जवान दुखापती झालेत. याप्रकरणी एकुण ५१ आरोपींना अटक करण्यात आली त्याच्या व्यतिरिक्त दगडफेकीत सहभागी असलेल्या ४ विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, एकुण ५४ निष्पन्न आरोपी व इतर २५० संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश शिवाजी वावरे यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून धार्मिक स्थळ विटंबनासह खुनाचा प्रयत्न, लोकसेवकाला दुखापत, घातक हत्याराने जबर दुखापत करणे, बेकायदेशिर जमाव करून दंगा करणे, ज्वलनशील पदार्थाने आगळीक करणे, सुरक्षीतता धोक्यात आणणारी कृती, हमल्याच्या उद्देशाने गृह अतिक्रमण, भारतीय हत्यार कायदा कलम ४ चे उल्लघंन, सार्वजनीक मालमत्ता नुकसान प्रतीबंधक कायदा कलम इत्यादी संदर्भातील कायदे कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

 

 

चौकट 

 

*जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे जनतेला आवाहन*

 

सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, काल दिनांक १९/०९/२०२४ रोजी नंदुरबार शहरात दोन गटामध्ये तणाव निर्माण होवुन झालेल्या घटने वावत कोणीही अफवा पसरवू नये तसे आढळून आल्यास संबधीतांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल नंदुरबार जिल्हा पोलीस दल सायबर सेल मार्फत समाज माध्यांवर बारकाईने लक्ष ठेवुन आहेत. शहरात शातंता प्रस्तापीत होण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. – श्रवणदत्त एस., जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *