*उन्मेष पाटील यांनी अखेर हाती बांधले शिवबंधन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित केला शिवसेनेत प्रवेश,*
*उन्मेष पाटील यांनी अखेर हाती बांधले शिवबंधन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित केला शिवसेनेत प्रवेश,*
Advertisement
( *चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव*)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात अखेर राजकीय भूकंप झाला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकिट कापण्यात आलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी आज दुपारी १२: ३० वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार व भाजपमधील काही पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, काल त्यांनी मुंबईत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. नंतर उद्धव ठाकरे यांची थेट मातोश्रीवर जाऊन भेटली. दरम्यान, आज उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेश झाल्याने जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील की करण पवार कोणाला उमेदवारी मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.