मनोरंजनसामाजिक

*वासुदेवाच्या कलागुणांना शासनाकडून प्रोत्साहन मिळेल का ?*


*वासुदेवाच्या कलागुणांना शासनाकडून प्रोत्साहन मिळेल का ?*

दिंडोरी : बाळासाहेब अस्वले

महाराष्ट्र मध्ये जुन्या काळी अनेक लोक परंपरा जपल्या जात होत्या त्यापैकी वासुदेव आला रे वासुदेव आला ही साद ऐकायला मिळायची परंतु आता मॉडेल जमान्यात महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला लुप्त होत चालले आहे. येणाऱ्या भावी पिढीला वासुदेव दिसतो की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे.ही कला जोपासत असताना महाराष्ट्रातील वासुदेवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वासुदेव या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी योग्य मानधन दिले पाहिजे याशिवाय रहावयास बेघराच्या सवलती देखील दिल्या पाहिजे अन्यथा ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे मार्गक्रमण करत सकाळी वासुदेवांनी दर्शन दिले.

ग्रामीण भागामध्ये पहाटे लवकर उठून हे कलाकार ‘वासुदेव आला रे वासुदेव आला सकाळच्या पहारी पांडुरंग बोला’वासुदेव आला हो वासुदेव आला. हे भक्ती गीत ऐकलं की समोर एक अंग भरून असणारा रंगबिरंगी पोशाख, डोक्यावर मोरांचा पिसारा, हातामध्ये टाळ चिपळ्या, गळ्यामध्ये कवड्यांची माळ, देवी देवतांचे फोटो, कपाळी गंध असे हवे हवहवेसे वाटणारे देखणे रूप अशा या पेहेरावातील वासुदेव आला की पहाटेच्या वेळी अभंग म्हणून दान मागत फिरताना हा मन प्रसन्न करणारा अनुभव आहे.

Advertisement

पूर्वीच्या वेळी गावात आलेल्या वासुदेवाला सन्मान देऊन ग्रामस्थ व सुहासिनी हातातले काम सोडून थोड्या वेळ का होईना दाद द्यायचे त्यानंतर घरातल्या लक्ष्मीने सुपा मध्ये दाणे घेऊन दान करायचे त्यानंतर वासुदेव गाण्यातून या पिढी जात कुळांचा उद्धार करून त्या लक्ष्मीला आशीर्वाद द्यायचे यावेळी या स्त्रियांचा कधीही दान करताना हात आखडत नव्हता त्यामुळे हे वासुदेव दान घेऊन तृप्त होत असे काळानुसार होत असलेल्या बदलावामुळे वासुदेव हळूहळू लुप्त होत चालला आहे.
आता मात्र शहरामध्ये सोसायटी,मोठ मोठी इमारत,कम्पेबंद वातावरणामुळे वासुदेवांना या ठिकाणी प्रवेश मिळत नाही घरांचे बंद असलेले दरवाजे आणि उशिरा उठत असलेले लोक त्यामुळे त्यांना अगतिक बनते दान मिळणे तर दूरच परंतु ही कला ऐकायला व पाहायला हे वासुदेवांसाठी वेदनादायी आहे. पिढी जात वारसा वासुदेवाच्या भावी पिढीला पहाटे उठून अंग पोशाख करणे गाणे म्हणणे मान्य नसल्याने ही त्यांची मुले वासुदेव न होता शिक्षण व्यवसाय किंवा नोकरी याला प्राधान्य देत आहे.वासुदेव कुटुंबातील बहुतांश कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये भटकंती करत असतात मात्र असे असले तरी बदलत्या काळामध्ये हा समाज विकासापासून वंचित राहिला असल्याचे बोलले जात आहे त्याचे कारणही तसेच आहे. केंद्रात ओबीसी राज्यात एनटी ब प्रवर्गात समावेश केल्याने शासकीय योजना या समाजापर्यंत पोहोचत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे तरी शासनाने यावर उपाययोजना करून या समाजासाठी विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पाऊल उचलण्याची मागणी वासुदेवांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *