भाजपच्या वतीने ठाणगावला शालेय साहित्याचे वाटप
भाजपच्या वतीने ठाणगावला शालेय साहित्याचे वाटप
सिन्नर प्रतिनिधी
भाजपा जनता पार्टीच्या वतीने नाशिक जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या हस्ते ठाणगाव येथे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी ठाणगाव यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भलेवाडी येथील गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.यामध्ये प्रत्येकी दोन वहया , कंपास पेटी, रंगपेटी, पेन व दप्तर आदी साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्याचे सार्थक झाल्याचे सांगितले. तसेच शाळा व शालेय परिसर अतिशय मोहक असल्याचे व विद्यार्थी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षकांचे विशेष कौतुक केले.यावेळी व्यासपीठावर भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव , भाजपा भ. वि. आ. राज्य उपाध्यक्ष तथा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकूंद काकड , ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे , माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे , भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे सर , ज्येष्ठ नेते शरद कासार , भाजपा तालुकाध्यक्ष बहीरू दळवी, भाजपा सिन्नर तालुका सरचिटणीस तथा जनसेवाध्यक्ष रामदास भोर , भाजपा ओबीसी सिन्नर तालुका अध्यक्ष मोहन आव्हाड, युवा नेते प्रतिक शिंदे , भाजपा नेते बाळासाहेब शिंदे, के. एल शिंदे , उपसरपंच विलास मोरे, अक्षय मेंगाळ , हिरामण मधे, राजु मंडोळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने न उपस्थित होते. शाळेचे शिक्षक पांडुरंग भोर यांनी प्रास्ताविक केले व भाऊसाहेब डगळे यांनी आभार मानले.



