*अनोख्या रॅलीत टाळ मृदंगाचा गजर व बॅनरने दिला शुद्धीकरणाचा संदेश*
*त्र्यंबकेश्वरला शांतिगिरीजी महाराजांची मौनव्रतात रॅली,नागरिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद !*
*अनोख्या रॅलीत टाळ मृदंगाचा गजर व बॅनरने दिला शुद्धीकरणाचा संदेश*
नाशिक : प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी भक्त परिवारासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर शहरातून मौनव्रतात अनोखी आणि लक्षवेधी रॅली काढली.या रॅलीत टाळ मृदंगाचा गजर आणि आणि बॅनरच्या माध्यमातून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा संदेश देण्यात आला.राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे,देश सेवा करावी, नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज,लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा, यांसह विविधांगी बोधात्मक विचार रॅलीत बॅनरच्या माध्यमातून देण्यात आले.स्थानिक नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तसेच भाविकांनी बाबाजींचे ठिकठिकाणी स्वागत करत उत्फुर्त प्रतिसाद दिला.
लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव असलेली लोकसभेची निवडणूक संपूर्ण भारतात निर्विघ्नपने पार पडावी यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर आश्रमात आठवडाभर जपानुष्ठान केले.या जप साधनेच्या सांगतेस त्र्यंबकेश्वर पुण्यनगरीत हजारो भाविकांनी उपस्थिती लाभली.यावेळी त्र्यंबकेश्वर परिसरात रॅली काढण्यात आली. महाराजांच्या वतीने शांततेत,मौनव्रतात अनोखी आणि लक्षवेधी रॅली काढण्यात आली.या रॅलीत टाळ मृदंगाचा गजर आणि आणि बॅनरच्या माध्यमातून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा संदेश देण्यात आला.राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे,देश सेवा करावी…खूप केले पुढाऱ्यांसाठी आता फक्त देशासाठी.. आता फक्त बाबाजींसाठी.. नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज…लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा… यांसह विविधांगी बोधात्मक विचार रॅलीत बॅनरच्या माध्यमातून देण्यात आले.एक विचाराने प्रेरित होऊन अंगात भगवा ड्रेस, हाती धर्मध्वज, शुद्धीकरणाचे बोधात्मक फलक, टाळ-मृदुंगाच्या गजरात मौनव्रत धारण करून मनात जप करत हजारो भाविकांनी त्र्यंबेश्वरमध्ये लक्षवेधी ग्राम प्रदक्षणा केली.रॅली दरम्यान चौकातील छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करत भगवान त्र्यंबकेश्वराला वंदन करत पवित्र कुशावर्तात स्नान,नामजप केले.गंगा माता मंदिर व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचे पूजन दर्शन यावेळी संपन्न झाले. राजकारणाचे शुद्धीकरण आणि देशसेवेसाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.जनता जनार्दनांची निष्काम भावनेने सेवा केल्यास नाशिक पुण्यभूमीचा कायापालट होऊ शकतो. विकासगंगा अवतरीत होऊ शकते.या निष्काम सेवेच्या प्रमुख अजेंड्यावर ‘लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा’ या हेतूने स्वामी शांतीगिरिजी महाराज निवडणूक लढवत असल्याचे भक्त परिवाराच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.