महिरावणी येथे इ.१०वी ‘उद्घाटन व करियर मार्गदर्शन’ कार्यक्रम
आत्मविश्वास असल्यास यश तुमचेच
:बाळासाहेब सोनवणे
महिरावणी येथे इ.१०वी ‘उद्घाटन व करियर मार्गदर्शन’ कार्यक्रम
नाशिक: प्रतिनिधी
शिक्षणप्रक्रियेत इ.१ली ते १०वी या सर्व इयत्तांमध्ये अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, मूल्यमापन प्रक्रिया व अभ्यास सर्वात सोपा असेल तर तो इयत्ता १०वीचा.तमचे दहावीचे वर्ष मात्र तुमचं जीवन,भावी वाटचाल, करिअर,आयुष्य या सर्व दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे.या परीक्षेमध्ये मूल्यमापन कसे केले जाते हे समजून-उमजून घेऊन परीक्षेचा बाऊ न करता,भरपूर अभ्यास करा, आत्मविश्वास ठेवा,यश तुमचंच आहे,असे प्रतिपादन मातोश्री गि.दे. पाटील माध्य.विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी केले.
महिरावणी येथील न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता १०वीच्या प्रथम “उद्घाटन शुभारंभ व करिअर मार्गदर्शन” प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.शितल पवार होत्या.व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बी.जी. वाघ,प्राचार्य डाॅ.महाजन,विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण शिंदे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शंकर खांडबहाले आदि उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करत दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब सोनवणे यांनी विद्यार्थांनी वाचन,नियोजन व मुल्यमापन पद्धती समजावून घेऊन कृती करण्याची जोड दिल्यास अभ्यासाची गोडी लागते.स्पर्धात्मक युगात ध्यानधारणेचे महत्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून विद्यार्थांना समजावून सांगितले. या कृतीस पाहुणे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी भरभरुन दाद दिली
यावेळी प्रमुख अतिथी डाॅ. बी.जी. वाघ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांना यशस्वी होण्यासाठी अंगी चिकाटी, जिद्द व आत्मविश्वास बाळगण्याचे आवाहन करत मोठे ध्येय उराशी बाळगा कारण यशाला शॉर्टकट नसतो असे त्यांनी अनेक दाखले देऊन स्पष्ट केले.तसेच सर्वोच्च शिक्षण घेऊन सतत अग्रभागी राहा असाही मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करत विद्यार्थांना ध्येय निश्चित करुन त्यानुसार मार्गक्रमण करावे तसेच वाचन, मनन, चिंतन व एकाग्रता यांचा मेळ घालून अभ्यासाचे नियोजन करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना बरबडे यांनी केले.यावेळी पुजा पगार, मयुरी काळे, पुष्पांजली खैरनार, ऋतुजा चव्हाण, पुजा भालेराव, सोनाली दाते, प्रिया गटकळ, रिंकू मोगल, सोनाली म्हस्के, हर्षदा सोनवणे यांसह इयत्ता नववी,दहावी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.