ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ताई रुपी सावली… जन्म दिनाच्या शुभेच्छा…. माझ्या ” रखुमाऊली ” ….!!


ताई रुपी सावली…

 

जन्म दिनाच्या शुभेच्छा….

 

माझ्या ” रखुमाऊली ” ….!!

 

मायाळू आणि मवाळ स्वभाव अशी तालुकाभर आणि तालुक्याच्या बाहेरही ज्यांची ओळख …

आपल्या कार्यकृत्वातून आपल्या कामाचा आपल्या कर्तृत्वाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटविणाऱ्या आमच्या डॉ.जयश्री ताई यांचा आज जन्मदिवस…

 

प्रत्येकाची मदत ही आपली जबाबदारी आणि प्रत्येकाची काळजी ही आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी ही आदरणीय साहेबांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीच तंतोतंत पालन करून अहोरात्र लोकसेवेसाठी जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या मदतीच्या सोबतीसाठी उभ्या असणाऱ्या ताईंचा हा स्वभाव सर्वांच्याच मनात घर करून आपलेपणाचा स्पर्श प्रत्येकाच्या मनाला नेहमीच करून जाणारा असतो.

जनसेवेची लागलेली गोडी अफाट असा जनसंपर्क हजारो युवकांच्या मोठ्या बहीण होऊन समस्या सोडवणाऱ्या जनमानसांच्या गर्दीतच आनंदाने रमणाऱ्या गोरगरीबांच्या प्रश्नावरती मार्ग काढून त्यांच्या साठी सदैव दिवसरात्र धावपळ करून प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावत प्रत्येकाच्या आयुष्यात एक तेजाचा एक विश्वासाचा दीप लावणाऱ्या महिलांच्या प्रश्नावरती , वैद्यकीय प्रश्नावरती सखोल असा अभ्यास करून मार्गदर्शन करणाऱ्या ताई…

समोरच्याला कधीही न दुखवणारा त्यांचा स्वभाव आणि त्यातूनच त्यांनी हजारोच्या मनात तयार केलेली जागा नक्कीच ताईंना उज्वल आणि यशस्वी भविष्याकडे घेऊन जाणार..

अध्यात्माची लागलेली गोडी आणि सोबतीला विठ्ठल रखुमाई ची अफाट अशी भक्ती आजच्या युवा पिढीला प्रत्यक्षदर्शी आषाढी वारीचं विठ्ठल रखुमाईच दर्शन घडवणाऱ्या, अध्यात्माची वाट आणि वारीचीही गोडी असणाऱ्या अशा उच्च शिक्षित कॅन्सर तज्ञ जुन्या आणि नव्या विचारांची सांगड घालून पुढे चालणाऱ्या गोरगरिबांसाठी लढणाऱ्या ताईंचा भविष्यकाळ नक्कीच उज्वल आणि तेजोमय असेल यात शंका नाही…

Advertisement

महिलांना प्रोत्साहित करून त्यांना त्यांच्या दोन हातांना हक्काच काम मिळावं त्यातून त्यांचा आपल्या कुटुंबाला एक आधार मिळावा, व्यस्त आयुष्यातून स्वतः साठी जगता यावं यासाठी सतत धडपडत असणाऱ्या महिला व युवतींच्या पाठिराख्या . त्यांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या त्यांना वेळोवेळी आपल्या वैद्यकीय अनुभवातून मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला देणाऱ्या ताई महिला सबलीकरणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.

 

ताईंची युवकांनी शेतीपूरक व्यवसायाला जोड देऊन विविध शेतीपूरक जोडधंदे करून आपले नाव रोशन करावं यासाठी नेहमीच नव्या शेतीपूरक व्यवसायांच्या शोधात राहून त्याची प्रत्यक्ष आयुष्यात अंमलबजावणी करता यावी यासाठी त्यांची धडपड ही नेहमीच सुरू असते.

 

वैद्यकीय सेवेतून लागलेली जनसेवेची गोडी आणि त्यातूनच समाज सेवेसाठी अविरतपने सुरू असलेली ही समाज सेवेची वारी…निरंतर अशीच सुरू राहो…!!

 

 

 

मांगल्य रुपी सावलीचे ….

 

“आबांच्या” विचारधारेचे…

 

 परिवर्तनाच्या वाटेवरचे…

 

 हे पर्व एकविरेचे….!!!

 

 

 

दृढदृष्ठी अन विकासाचे….

 

ध्येय आकाशी झेपावण्याचे..

 

संत सावलीच्या आशिर्वादाचे.

 

हे पर्व एकविरेचे….!!!

 

 

 

महिला सबलीकरणाचे…

 

 युवतींच्या आधाराचे…

 

पुरोगामी विचारधारेचे….

 

 हे पर्व एकविरेचे …..!!!

 

 

 

अध्यात्म अन् संत साधनेचे

 

 हे रूप जनसवेचे..

 

तरुणाईच्या प्रकाशवाटेचे

 

 हे पर्व एकविरेचे ….!!!

 

 

 

आरोग्यदायी धनसंपदाचे.

 

 हे रूप ” जया ताईचे”…..

 

 चैतन्य अन् परिवर्तनाचे…

 

हे पर्व एकविरेचे ….!!!

 

 

 

अजन्म या सोबतीचे….

 

 हे पर्व जनसेवेचे….

 

नवं संकल्प बांधणीचे….

 

पर्व हे माझ्या ताईचे ….!!!

 

अशा आमच्या रखुमाई डॉ.जयश्री ताई बाळासाहेब थोरात तुम्हास जन्म दिनाच्या खुप खुप शुभेच्छा…!!

 

– शब्द / सागर किसन हासे

 

– राजापूर / – 8999598470


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *