नाशिककरांचा पर्यावरण जाहीरनामा, मंगळवारी हुतात्मा स्मारकात बैठक
नाशिककरांचा पर्यावरण जाहीरनामा, मंगळवारी हुतात्मा स्मारकात बैठक
नाशिक प्रतिनिधी
लोकशाहीचा मोठा उत्सव अर्थात निवडणूक लवकरच सुरू होत आहे. यामध्ये संसदेत जाणारे आमचे प्रतिनिधी देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. वीस वर्षापूर्वी कोणी पाणी विकत घेवून पिणार हे मान्य केलं नसतं तसेच वीस वर्षांनी ऑक्सिजन पाठीवर घेवून फिरावं लागेल अशी परिस्थिती येवू नये.शुध्द पाणी पिण्यास देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे .परंतु नागरिकांचे ही काही कर्तव्य आहे.तसेच लोकप्रतिनिधी यांना पर्यावरणासाठी जागृत राहण्यासाठी पर्यावरण प्रेमी यांच्या कडून पर्यावरण जाहीरनामा देवून भविष्यात नाशिकच्या विकासा बरोबर पर्यावरणाचा विकास व्हावा स्वच्छ हवा व पाणी नागरिकांना मिळावे म्हणून नाशिक मधील सर्व निसर्गावर प्रेम करणारे सर्व पर्यावरण प्रेमी नाशिककरांनी आपले मत व विचार मांडण्यासाठी मंगळवार दिनांक 16/4/2024 रोजी सांय 5. 00 वाजता हुतात्मा स्मारक जिल्हा न्यायालयासमोर सी बी एस नाशिक या ठिकाणी सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन निसर्गप्रेमी नाशिककरांनी केले आहे.