नांदूर शिंगोटे चास रस्त्याचे काम सुरू ; जुना नकाशा रस्ता मात्र डागडुजीच्या प्रतीक्षेत : ठाणगाव आदिवासी संकुलही भेसळखोरांच्या विळख्यात
नांदूर शिंगोटे चास रस्त्याचे काम सुरू ;
जुना नकाशा रस्ता मात्र डागडुजीच्या प्रतीक्षेत :
ठाणगाव आदिवासी संकुलही भेसळखोरांच्या विळख्यात
नांदूर शिंगोटे प्रतिनिधी
नांदूर शिंगोटे ते चास रस्त्याचे काम अगदी प्रगतीपथावर असून सदरचा रस्ता होणे तितकेच महत्त्वाचे होते व त्याप्रमाणे त्या रस्त्याचे कामही त्याप्रमाणे सुरू आहे मात्र निमोन नाका ते महावितरण कंपनी पर्यंत असलेला गाव नकाशा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्वीच्या नकाशावरील रस्ता हा जुना चास रस्ता वहिवाटीत असतांना या रस्त्याची साधी डागडुजीही केली जात नसल्याने वहीवाट बिकट झाली आहे.
सध्या नवीन रस्त्याचे चास नाक्यापासून जे सुरू असलेले काम आहे त्याचप्रमाणे निमोन नाकाते महावितरण कंपनीपर्यंत या रस्त्याचे ही काम होणे तितकेच महत्त्वाचे असताना साधी त्या रस्त्याची सुद्धा न केल्याची खंत नांदुर-शिंगोटेकरांनी केली आहे.
चास रस्त्याची निर्मिती झाली तेव्हापासून जुना चास रस्ता हा महत्त्वाचा रस्ता आहे.सदरच्या रस्त्यावरून आजही चास नळवाडी कासरवाडी डोंगरगाव देवठाण व अकोला या ठिकाणी जाणारा मार्ग आहे मात्र ह्या मार्गाची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. पूर्वीपासून या रस्त्यावरून एसटी महामंडळाच्या बसेस डोंगरगाव नळवाडी चास देवठाण आदी गाड्या ह्या मार्गावरून धावत होत्या.मात्र सदरच्या रस्त्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नसल्याचे दिसत आहे. सदरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.त्याचप्रमाणे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी पाहणी करून व गाव नकाशा प्रमाणे या रस्त्याच्या अतिक्रमण काढून त्वरित हा रस्ताही वाहतुकीला खुला करणे महत्त्वाचे आहे दोन्ही रस्ते महत्त्वाचे असताना केवळ एकाच रस्त्याकडे लक्ष का दिले जाते. हेच कळत नाही. आजही या रस्त्या वरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे सर्वच गावांचे लोक ह्याच रस्त्याचा आजही वापर करत आहे त्याचप्रमाणे या रस्त्यावरून कमीत कमी 200 ते 300 कुटुंब दररोज प्रवास करतात शालेय विद्यार्थी शेतकरी सर्वच या रस्त्याचा वापर करत असताना साधी या रस्त्याची डागडुजी सुद्धा होत नाही सदरचा रस्ता हा अति महत्त्वाचा सुद्धा आहे निमुन नाका परिसरातून ह्याच रस्त्यावरून लोक आजही प्रवास करतात सदरचा रस्ता हा चास कडे जाणारा जवळचा मार्ग सुद्धा आहे.
अकोले डोंगरगाव समशेरपुर या ठिकाणी जाणारे लोक नगर भागातून आल्यानंतर ह्याच रस्त्याने जातात मात्र सदरच्या रस्त्यावरून चालणे आजही मुश्किल झालेली आहे नकाशा रस्त्याप्रमाणे हा रस्ता होणे गरजेचे आहे नकाशात पंचवीस मीटरचा रस्ता दाखवत असताना आज मी तिला दहा फुटाचा सुद्धा रस्ता राहिलेला नाही यास हा रस्ता ज्या खात्याकडे आहे त्याचे अधिकारीच कारणीभूत आहे आज पर्यंत या रस्त्यावर साधा मुरून सुद्धा टाकला नाही तेव्हा नवीन चास रस्त्याप्रमाणे जुन्या चास रस्त्याची ही कामे करण्यात यावी.
अशी मागणी नांदूर शिंगोटे ग्रामस्थांसह सरपंच सौ शोभा दीपक बरके यांनी केली आहे तेव्हा वरिष्ठ पातळीवरून त्वरित या रस्त्याची पाहणी करून या रस्त्याचे कामही होणे महत्त्वाचे आहे.
प्रतिक्रिया
नवीन सुरू असलेल्या चास रस्त्याप्रमाणेच महावितरण कंपनीचे निवड नाक्यापर्यंत असलेल्या रस्त्याचे काम करण्यात यावे व हा रस्ता वाहनधारक ग्रामस्थांसाठी नवीन बनवण्यात यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून सदरच्या रस्त्याची पाहणी करावी अशी मागणी नांदुर-शिंगोटे गावच्या लोककनियुक्त सरपंच शोभा दीपक बरके यांनी केली आहे.
.…… लक्षवेधी :-
आदिवासी संकुल भेसळखोरांच्या विळख्यात
ठाणगाव मध्ये जिल्हा परिषदेच्या इ व द तर्फे आदिवासी संकुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाच्या कार्या देशात नमूद अटीशर्ती प्रमाणे काम सुरु नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे संकुल उभे करतांना वापरले जाणारी बांधकाम सामुग्री दुय्यम दर्जाची असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या तक्रारिंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने उप अभियंता पाटील यांचेशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला तथापी गेल्या दोन दिवसात एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. या कामात जाणीवपूर्वक भेसळयुक्त सामुग्री वापरली जात नाही ना? कंत्राटदार आणि अभियंता यांची मिलीभगततर नाही ना? अशी शंका त्यामुळे उपस्थित होत आहे.