कंपनी कामगाराचा सेवा निवृत्ती सन्मान
कंपनी कामगाराचा सेवा निवृत्ती सन्मान
सिन्नर:
येथील ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीज लि. कंपनीतील कामगार सुनिल लोहारकर हे ३१ मे २०२४ रोजी २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. सेवा निवृत्ती निमित्त कंपनी व्यवस्थापनाने भेटवस्तू व शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सहकुटुंब सन्मान केला. कंपनीच्या वेल्फेअर सोसायटी आणि क्रेडिट सोसायटीच्या वतीनेही त्यांना गौरविण्यात आले. या किशोर राठी, फॅक्टरी मॅनेजर सतीश पगार, बिरेश्वर दासगुप्ता, अतुल बियाणी, प्रशांत भावसार, जितेंद्र केसावलेकर, किरण भावसार आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोहारकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अरविंद आरोटे यांनी सुत्रसंचलन केले. हर्षल लोहारकर यांनी आभार मानले.