पर्यावरण जागृतीसाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान
पर्यावरण प्रेमी नाशिककरांचा जाहीरनामा:
पर्यावरण जागृतीसाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान
नाशिक प्रतिनिधी
लोकशाहीचा मोठा उत्सव अर्थात लोकसभा निवडणूक देशातील संसदेत आपल्या कार्यक्षेत्रातील समस्या सोबत देशात भेडसावणाऱ्या समस्या यावर उपाय शोधणे व कायद्यात बदल करून त्याची अंमलबजावणी करणारी सर्वोच्च व्यवस्था या व्यवस्थेत सहभाग नोंदविणारा आमचा लोकप्रतिनिधी त्यालाच जर समस्या समजल्या व त्याने त्या सक्षमपणे मांडून न्याय मिळवला तर नक्कीच बदल घडेल याच उद्देशाने देशातील प्रत्येक शहरातील वाढणारे तापमान विकासाच्या नावावर होणारी पर्यावरणाची हानी व बदलणारी पर्यावरणाची चक्र, नद्या, नैसर्गिक नाले व उपनद्या नष्ट होण्यास कारणीभुत असलेल्या गटारी, कॉंक्रीटच्या माध्यमातून होणारा विकास आदी सर्व विषयावर नाशिक मधील सर्व पर्यावरण प्रेमी नागरिक व संस्था एकवटल्या असून हुतात्मा स्मारक नाशिक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. जो उमेदवार नाशिकच्या विकासा बरोबर येथील पर्यावरण व हवामान याचा समतोल राखत नदीच्या स्वच्छ, सुंदर, अविरल वाहण्याची हमी घेईल त्याला समर्थन जाहीर करून पर्यावरण जनजागृतीमध्ये या विषयाचा समावेश करेल त्यांना मतदान करण्याची विनंती पर्यावरण प्रेमी करतील. नाशिक आर्थिक, अध्यात्मिक इतिहासिक व कुंभमेळ्याची पार्श्वभूमी असलेले कार्यक्षेत्र असलेला मतदार संघ असल्याने पर्यावरण प्रेमी जागरूक नागरीक बहुसंख्य असल्याने जाहीर सभेत पर्यावरण जाहीरनामा वाचून दाखवण्याचा व आश्वासन घेण्याचा विचार या बैठकीत समंत करण्यात आला. यावेळी विविध संस्था प्रतिनिधी यांनी आपले विचार मांडले. वातावरणीय बदलाने शेतकरी राजा हवालदिल झालेला असतांना काँक्रिटच्या विकासाच्या सरकारी धोरणावर अंकुश घालून शाश्वत विकासाची कास धरण्याची मागणी भावी खासदारांना करण्याची हीच योग्य वेळ आहे असा सूर “जाहीरनामा निसर्गाचा” या विषयी पर्यावरण प्रेमींच्या बैठकीत उमटला. जनतेने नाशिकच्या इच्छुक खासदाराला निसर्ग रक्षणासाठी बांधील करण्यासाठी प्रत्यक्ष जनतेत जावून पर्यावरण प्रेमी निसर्गाचा प्रचार करणार आहेत. इच्छुक उमेदवारांना भेटून त्यांचे पर्यावरण रक्षणाबाबत मत जाणून घेवून जनतेचा पर्यावरणीय जाहीरनामा उमेदवारांना देवून 4 ते 5 प्रमुख मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याची उमेदवारांकडून ध्वनीमुद्रित स्वरूपात हमी पर्यावरण प्रेमी संस्थांकडून घेतली जाणार आहे. या बैठकीत नदी संवर्धन, डोंगर टेकड्यांचे रक्षण, कॉंक्रिटचा अतिरेक थांबविणे, वृक्षसंवर्धन, शाश्वत विकास यासारख्या पर्यावरण विषयक प्रमुख मागण्यांची अंलबजावणी करणारे खासदारच नाशिक व देशासाठी योग्य ठरतील असे सर्वानुमते ठरविण्यात आले. प्रभू श्रीरामांच्या पावन नाशिक नगरीत गोदामाई अवतरित झालेली असतांना नदीची बिकट अवस्था कुठल्याही उमेदवाराला विचलित करणारी असावी. एसी गाडीत बसून वाढत्या उन्हाच्या झळा लागणाऱ्या नाशिकच्या खासदाराला जैवविविधतेने समृद्ध सह्याद्री पर्वतरांग खुलेआम नेस्तनाबुक केली जात असतांना भविष्यातील पाऊस पाण्याची चिंता सतावणारी असावी. काँक्रिटच्या विकासगंगेत फक्त आपले घोडे न्हाहून घेण्यापेक्षा नाशिकच्या आल्हाददायक हवेसाठी प्रयत्नशील खासदार नाशिकला लाभावा अशी इच्छा या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.
कॅनडा कॉर्नर येथे रात्रीच्या वेळेस 100 वर्षांपूर्वीचे झाड तोडण्यात आले होते त्यांचे स्वता वार्तांकन करून त्या विकासकाविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या माध्यम प्रतिनिधी विठ्ठल भाडमुखे यांचा वटवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. .
या बैठकीला जेष्ठ कार्यकर्ते रमेश अय्यर, मुक्तेश्वर मूनशेट्टीवार , भारतीताई जाधव, राजु शिरसाठ , प्रा सोमनाथ मुठाळ, उदय थोरात, सुनिल परदेशी, जगबिर् सिंग , रोहित कानडे, मनीष बाविस्कर , तुषार गायकवाड व प्रकाश बेळे आदी उपस्थित होते
आयोजन निशिकांत पगारे यांनी केले तर सूत्रसंचालन योगेश बर्वे यांनी केले. ..