चर्मकार महासंघाच्या वतीने महामानवास अभिवादन
चर्मकार महासंघाच्या वतीने महामानवास अभिवादन
नाशिक प्रतिनिधी
शिवाजी रोड येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने १३३ व्या जयंती निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नानासाहेब घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संपर्कप्रमुख प्रमोद नाथेकर माजी नगरसेवक सुरज भाऊ दलोड ढोर समाजाचे जिल्हाध्यक्ष पिंटू भाऊ गांधले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहर प्रमुख विष्णू लोकरे अजय भाऊ तसंबड मोहन पवार राजा अहिरे विनोद शेळके सतीश साबणे सतीश कागडा राना पारचे राजेश राठोड सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहरप्रमुख विष्णू लोकरे यांनी केले. प्रकाश पवार यांनी आभार मानले.