व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कोंडाजी मामा आव्हाड ; सिन्नरकरांनी साजरा केला विजयोत्सव
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कोंडाजी मामा आव्हाड ;
सिन्नरकरांनी साजरा केला विजयोत्सव
सिन्नर प्रतिनिधी
क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी विजय मिळवला.
त्यांच्या निवडीने तालुक्याला पुन्हा एकदा संस्थेच्या अध्यक्षपदी संधी मिळाल्याने तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तालुकाध्यक्ष अॅड.संजय सोनवणे नामदेवराव कोतवाल.दत्ता गोळेसर डॉ विष्णु अत्रे हेमंत देवनपल्ली महिला तालुकाध्यक्षा डॉ प्रतिभा गारे शहराध्यक्षा मंगला गोसावी ऊत्तम कर्डक दत्तात्रय डोंगरे आदींनी आव्हाड यांचा सत्कार केला. आव्हाड यांचेबरोबर संचालक म्हणून हेमंत नाईक,जयंत आव्हाड, नंदा भाबड या तालुक्यातील नवनिर्वाचित संचालकांचेही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.