ताज्या घडामोडी

जरांगेपाटील मराठा रॅलीत समाजाच्या सहभागासाठी शरद शिंदे यांचे उपोषण 


जरांगेपाटील मराठा रॅलीत समाजाच्या सहभागासाठी शरद शिंदे यांचे उपोषण 

 

सिन्नर प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजातील मुलामुलींना आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात जरांगे पाटील आपली शांतता रॅली करत आहेत . आरक्षणाच्या या एक प्रकारच्या क्रांतीत सिन्नर तालुक्यातील समाज कार्यातील प्रभावी प्रतिनिधी आणि जाणकार या नात्याने शिवसेना शिंदे गट सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील,तालुक्यातून जास्तीत जास्त मराठा सहभागी व्हावेत या जनजागृतीसाठी सिन्नर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.

दि. १२ ऑगस्ट या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सकल मराठा अठरा पगड समाज आणि संघर्ष समिती ,

स्वराज्य संघटनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

रविवार दि.११/८/२०२४ रोजी सकाळी१०वा.सिन्नर तहसिल कार्यालयासमोर या उपोषणाला उपोषण सुरु करण्यात आले होते.मराठा समाजाच्या मागण्याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले असून,दि. १३ रोजी या उपोषणाची सांगता आहे. शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात संदिप लोंढे, जयश्री गायकवाड,शिवाजी गुंजाळ,लिलाबाई तुपे, राहुल रूपवते,मोरे ,परसराम सातपुते,शांताबाई शिंदे,,चिंधुभाऊ शिंदे

सुनिता शिंदे ,,काशाबाई शिंदे,अर्जुन घोरपडे,मनकर्णिका गायकवाड, कैलास मोरे,बालाबाई पवार,कैलास हिरे,बेबीताई गायकवाड,रामबाबा शिंदे ,शिलाबाई रामदास पवार,योगिताताई पाटील,प्रमिलाताई लोंढे,शिवछावाचे मुरकुटेताई, पिंगळेदादा आणि टारगर ग्रुपचे पप्पू दादा यांनी सहभाग घेवून उपोषणास पाठिंबा दिला.दिवसभरात परिसरातील जवळपास साडेचारशे मराठा आणि अठरापगड समाजातील बंधु भगिनींनी शरद शिंदे पाटील यांच्या उपोषणास भेट देत सहभाग नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *