ताज्या घडामोडी

शिवसेना (उबाठा) भगवा सप्ताह पहिल्याच दिवशी ७५० सभासद नोंदणी – फड संगमनेर तालुका व शहर शिवसेना (उबाठा) भगव्या सप्ताहाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ 


शिवसेना (उबाठा) भगवा सप्ताह पहिल्याच दिवशी ७५० सभासद नोंदणी – फड

संगमनेर तालुका व शहर शिवसेना (उबाठा) भगव्या सप्ताहाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ 

 

संगमनेर –

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने भगवा सप्ताहाचे उद्घाटन रविवारी (दि११) जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व संपर्क प्रमुख सुर्यकांत शिंदे यांचे शुभहस्ते संगमनेर बसस्थानकावर शानदार शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ७५० सभासद नोंदणी करण्यात आला असल्याची माहिती तालुका संजय फड यांनी दिली.

 

शिवसेनेचे निवडणुक चिन्ह मशाल व पक्षाची विचारधारा, नागरिकां पर्यंत पोहचवण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार

या भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेचा शुभारंभ संगमनेर बसस्थानक येथे रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख रावसाहेब खवरे. विधानसभा संपर्कप्रमुख. सूर्यकांत शिंदे. महिला आघाडी संपर्कप्रमुख. बेबीताई लांडगे. समन्वयक. दिलीप साळगट तालुकाप्रमुख. संजय फड. शहर प्रमुख. आप्पा केसेकर. अपंग सेनेचे जिल्हाप्रमुख. जालिंदर लाहमगे संघटक. कैलास वाकचौरे. माजी नगरसेवक, घनश्याम जेथे , अशोक सातपुते ,शहर संघटक योगेश बिचकर , उपशहर प्रमुख सुदर्शन इटप, उपशहर प्रमुख बाळासाहेब घोडके, संघटक पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख. बालू पीडियार, दीपक मुळे, समिर औझा ,युवासेना गोविंद नागरे , भाऊसाहेब हासे ,सुरेखा गुंजाळ आदिसह तालुकातील , शहरातील पदअधिकारी व अंगीकृत संघटना पदाधिकारी , शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाचे उद्घाटन होताच सभासद नोंदणीला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला . पहिल्याच दिवशी या सप्ताहाला भरघोस प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी सुमारे ७५० सभासद नोंदणी झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना मजबूत करून तळागाळापर्यंत पक्षाची विचार धार पोहचविण्याचे काम केले जाणार आहे. याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या यात्रेमुळे शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 

कोट – संगमनेर तालुका व शहरात भगवा सप्ताह साजरा केला जात आहे. तालुका प्रमुख संजय फड यांचे नेतृत्त्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर मशाल चिन्हं, पक्षाची विचारधारा नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही यात्रा दि. ११ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट अशी २० दिवस चालणार आहे. संजय फड – शिवसेना संगमनेर तालुका प्रमुख


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *