सिन्नर स्वराज्य पक्षाचे लाटणे आंदोलन
सिन्नर स्वराज्य पक्षाचे लाटणे आंदोलन
सिन्नर प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेत प्रवेश करून तालुकाध्यक्ष पद मिळवलेले शरद शिंदे यांच्या
नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षेसाठी लाटणे आंदोलन छेडण्यात आले.महात्मा पुतळा जवळ हातात लाटण घेऊन महिला व पुरुषांनी एकत्र येत शनिवार २४ रोजी १२वाजता बदलापूरच्या घटनेसह अन्य ठिकाणी महिला, बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेध केला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. रूपेश नाठे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गोसावी,युवा जिल्हा अध्यक्ष उमेश शिंदे यांच्या उपस्थितीत लाटणे आंदोलन झाले.यावेळी महिलावरील अत्याचार कमी झालाच पाहिजे,
अत्याचार करणारया नराधमाला कडक कारवाई झालीच पाहिजे,लग्नाच्या वयाची अट शिथिल झाली पाहिजे,
लग्नाचा निर्णय ऐच्छिक झाला पाहीजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजीराजे आगे बढो…
स्वराज्य पक्षाचा विज असो अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी स्वराज्यचे निवेदन स्विकारले.
यावेळी विजय चुंबळे,रेखा जाधव, शिवाजी गुंजाळ, जयश्री गायकवाड महिला तालुका अध्यक्ष,नितीन दातीर,सुरेश सानप,मंगला मोरे, निशा वराडे,प्रमिला लोंढे, रामबाबा शिंदे, योगिता पाटील, चिंधुभाऊ गुंजाळ,स्मिता लोणारे,सुरेखा वडस्कर,,रूषीकेश कटारे, भुषण रुपवते,पिनु शिंदे, क्रुष्णा पटेल, नंदु साळवे,अलका वाकचौरे, माया जाधव,काशाबाई शिंदे, लिलाबाई तुपे,माया सुकेणकर,सुरेखा शिंदे, पुनम दळवी. वैष्णवी बर्डे,मणिकर्णिका गायकवाड,ज्योती सुर्यवंशी,रतन जाधव,हिरामण जाधव,तानाजी शिंदेसह महिला पुरुष सहभागी होते.