क्राईम

नाशिक पोलिसांनीही घ्यावा हा आदर्श ; एपीआय मयूर भामरे यांच्या नेतृत्वात निजामपुर पोलीसांची दमदार कामगिरी ; छापे टाकुन बनावट रासायनिक खताचा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त 


नाशिक पोलिसांनीही घ्यावा हा आदर्श ;

 

एपीआय मयूर भामरे यांच्या नेतृत्वात निजामपुर पोलीसांची दमदार कामगिरी ;

छापे टाकुन बनावट रासायनिक खताचा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त 

 

धुळे प्रतिनिधी

 

रस्त्यावर धावणाऱ्या गाडीत बनावट रासायनिक खते आहेत, या संशयावरून निजामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रासायनिक खतांचे गोदामच हाती लागले आहे. निजामपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए पी आय मयूर भामरे यांनी रस्त्यावर सापडलेल्या गाडीतील बनावट खतांवर समाधान न मानता थेट गोदामाचा शोध घेऊन, मुळावरच घाव घातल्याने शेतकऱ्यांना फसवणाऱ्या एका नराधम प्रवृत्तीला मुसके घालण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे खरे तर गुटखा कारवाईत ए पी आय भामरे यांचे मार्गदर्शन नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांनी घ्यायला हवे.

या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, दिनांक २३/०८/२०२४ रोजी सपोनि मयुर भामरे, यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ग्रामीण रुग्णालय, जैताणे ता. साक्री समोर लामकाणी रोडवर एक महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच.१५ सीके २७०५ या वाहनात बनावट रासायनिक खतांच्या गोण्या भरलेल्या असुन त्याच्यावरील चालक हा हे बनावट खते गावोगावी जावुन विक्री करणार आहे.त्यानंतर सपोनि मयुर भामरे,पोहेकॉ नारायण माळचे, पोकॉ दिपक महाले, पोकॉ राकेश महाले, पोकॉ मुकेश दुरगुडे, पोकॉ गौतम अहिरे यांनी जैताने ग्रामीण रुग्णालय येथे सापळा लावून ती पीक अप ताब्यात घेतली.

तीच्यात खतांच्या गोण्या असल्याची खात्री पटताच निजामपुर पोलीस ठाण्यात आणून जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाठ, यांना भ्रमण ध्वनीवरून खताबाबत माहिती दिली.भामरे यांनी ही खते बोगस असावीत असा संशय व्यक्त केल्याने कृषी अधीक्षकांनी दुसऱ्या दिवशी नाशिकचे विभागीय तंत्र अधिकारी उल्हास प्रल्हाद ठाकुर, प्रदिपराव निकम, मोहिम अधिकारी, जिल्हा परीषद धुळे, योगेश सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, साक्री, अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धुळे, आर. एम. नेतनराव कृषी अधिकारी, पंचायत समिती, साक्री यांना निजामपुर पोलीस ठाण्यात पाठवले. आल्यानंतर त्यांनी निजामपुर पोलीस स्टेशन येथे उभी असलेली महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातील खताची पाहणी व चौकशी केली असता एकूण ७५,६००/- रुपये किंमतीचा खतांचा साठा असुन या खताच्या बॅगेवर कायदयानुसार उत्पादकाचे नाव नमुद करणे बंधनकारक असतांना उत्पादकाचे नाव नमुद केले नाही. तसेच हयुमिक शक्ती या खताचे बॅगेवर बॅच नं. नमुद नाही व त्याची कोणतीही खरेदीची बिल व अन्य दस्तऐवज उपलब्ध केले नसल्याने प्रो.प्रा श्री. राजु भटु राठोड, मे. एस. आर. फर्टीलायझर अंण्ड केमीकल्स वर्धाणे ता. साक्री जि. धुळे व इतर यांचे विरुध्द निजामपुर पोलीस स्टेशनला सिसिटीएनएस गुरन ०२२१/२०२४ खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड २(aa) (ab)(n) (n) (p) (९),३,४,५,६,७,८,१२,१३,१९,२०८,२२०, २१००, २१(०),३५ (१) (a) (b) तसेच जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (७),७,८,९,१० त्याचप्रमाणे भारतीय न्यांय संहीता कलम ३१८, ३(५) प्रमाणे गुन्हयाची नोंद केली. इ गाली असुन सदर गुन्हयात महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच. १५ सीके २७०५ ही खताच्या साठयासह जप्त करण्यात आली असुन गुन्हयाचा तपास सपोनी मयुर भामरे स्वतः करीत आहेत.

Advertisement

 

सदर गुन्हयाचा पुढील तपासात मॉर्केटर मे. एस. आर. फर्टीलायझर अंण्ड केमीकल्स वर्धाणे ता. साक्री जि. धुळे, प्रो.प्रा. श्री. राजु भट्ट राठोड यांचे साक्री व वर्थाने येथील गोडाऊन मध्ये छापा टाकुन एकूण २४,९८,०१५/- रुपये किंमतीचा रासायनिक खते व किटकनाशक संशयीतरित्या आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक धुळे, श्रीकांत धिवरे,.अपर पोलीस अधिक्षक धुळे, किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री, संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे सोबत पोहेकॉ नारायण माळचे, पोकॉ दिपक महाले, पोकॉ राकेश महाले, पोकॉ मुकेश दुरगुडे, पोकॉ गौतम अहिरे, तसेच जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली उल्हास प्रल्हाद ठाकुर, विभागीय तंत्र अधिकारी, नाशिक, प्रदिपराव निकम, मोहिम अधिकारी, जिल्हा परीषद धुळे, योगेश सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, साक्री, अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धुळे,, आर. एम. नेतनराव कृषी अधिकारी, पंचायत समिती, साक्री यांनी संयुक्तपणे केली आहे.

 

खरे तर गुटखा वाहतूक आणि विक्रीला पायबंद घालण्यासाठी नाशिक शहर आणि जिल्हा पोलिस अशा प्रकारच्या कारवाया करतात तेंव्हा त्यांनी मयूर भामरे या पोलिस अधिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. रस्त्यावर सापडलेल्या मुद्देमालावरच कारवाई करून न थांबता तो माल कुठून आला, कुठे विक्रीला जाणार होता याचा शोध घ्यायला हवा, जो कधीच घेतला जात नाही. नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या कारवाया त्यामुळेच केवळ फार्स ठरत आहेत. सीमेवरील गुजरात राज्याच्या शहरातून गुटखा राजरोस महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जातो. पोलिसांच्याच एका पथकांकडून त्याला पायलटिंग केली जाते. अनावधानाने हा गुटखा एखादे वेळी पकडला गेलाच तर तेव्हढ्याच मुद्देमालावर कारवाई करण्याचे सौजन्य पाळले जाते. पुरवठादार आणि खरेदीदार यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस नाशिक पोलिसांनी अद्यापपर्यंत दाखवले नाही. ते धाडस दाखवून पोलिसत्व सिद्ध करण्यास काय हरकत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *